वाढदिवशी वर्षभरापूर्वी साखरपुड्याचा मुहूर्त; त्‍याच दिवशी दुर्देवी घटना

वाढदिवशी वर्षभरापूर्वी साखरपुड्याचा मुहूर्त; त्‍याच दिवशी दुर्देवी घटना
young boy death
young boy deathyoung boy death
Updated on

तांदलवाडी (जळगाव) : येथून जवळच असलेल्या दसनूर (ता. रावेर) येथील तरुणाचा वाढदिवशीच विजेच्या धक्याने मृत्यू (Electric shock death) झाल्याची घटना बुधवारी (ता.९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अमित उर्फ ओम पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. (jalgaon-young-boy-death-electric-current-on-birthday)

दसनूर येथील प्रगतशील शेतकरी (Farmer) अविनाश बाजीराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा अमित हा नेहमी शेतीच्या कामात व्यस्त राहत असे. दरम्यान गावातच त्यांच्या नवीन घराचेही बांधकाम सुरु असल्याने तो बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आला. थोड्या वेळानंतर तो तरूण वर तयार झालेल्या गच्चीवर उभा होता. जवळूनच विजेच्या मुख्य प्रवाह असलेल्या तारांना अनावधानाने त्‍याचा स्पर्श झाला व त्याचा जागीच मृत्यु झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री नऊ वाजेला शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उन्नवणे तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्टेबल आब्बास तडवी करीत आहेत.

young boy death
गणिताच्या गुरुजींना वाढदिवशी आयुष्याच्या ‘बेरजे’चे गिफ्ट!

तोच दिवस त्‍याच्‍यासाठी शेवटचा

दुर्देव म्हणजे त्याच दिवशी तरुणाचा वाढदिवसही होता. मागील वर्षी याच दिवशी त्याचा साखरपुडा देखील झाला होता. योगायोग असा मृत्यू देखील ९ जून याच दिवशी झाला. अशा प्रकारे त्या तरुणावर काळाने घाला घातला. काही महिन्यांपुर्वीच त्याचे लग्न झाले होते.

मित्रांची वाढदिवसाची तयारी अन्‌ सारे निशब्‍द

अमितचा स्वभाव बोलका, नेहमी हसतमुख होता. वाढदिवस असल्याने सकाळपासूनच त्याला मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठांकडून सुभेच्छा होत होता. संध्याकाळची मित्रांकडून वाढदिवसाची चाललेली जय्यत तयारी. मनमिळावू मित्र गमवल्याने मित्रपरिवार निशःब्द होता. काळ जवळ आला होता हे कुणास ठाऊक! अमितच्या मृत्युची बातमी परीसरात वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात पत्नी, आई- वडील, बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com