esakal | जळगाव जिल्ह्यात २८ टक्के लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

जळगाव जिल्ह्यात २८ टक्के लसीकरण

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः कोरोना महामारीवर (Epidemic) कोरोना लसीकरण (Corona Vaccination) हाच प्रभावी उपाय आहे. यामुळे प्रत्येकाने लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. दुसरी लाट संपल्यात जमा असताना आता तिसऱ्या लाटेचे (Corona 3rd Wave) संकट ‘आ’ वासून उभे आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन सज्ज आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी अधिकाधिक नागरिकांना लस देण्यावर भर आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. सुटीचे दिवस वगळता लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू राहील. अधिकाधिक लसींचा पुरवठा व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

कोरोना लसीकरणात आतापर्यंत १७ लाख तीन हजार २७६ नागरिकांचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झाले आहे. यात ग्रामीण भाग आघाडीवर असून, सुमारे दोन लाख तीन हजार ४३४ नागरिकांनी लस घेतली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहाअखेर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी २७.८९ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून राबविण्यास सुरवात झाली. आरोग्य प्रशासन, फ्रंटलाइन वर्कर्स प्राधान्यक्रमाने लसीकरण झाले आहे. त्यानंतर ४५ वर्षे वयोगटांसह जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महावितरण, विद्यापीठ प्रशासन सर्वसामान्य नागरिक, तसेच १८ वर्षे वयोगटांवरील नागरिकांचे लसीकरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या लस मात्रेनुसार ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत केवळ नऊ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले होते. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागपातळीवर आवश्यक प्रमाणात लस मात्रेच्या पुरवठ्याची मागणी केली होती. त्यानुसार सर्वच स्तरांवरून २० ऑगस्टनंतर लसीकरणास वेग देण्यात आला असून, सर्वप्रथम ४९ हजार, ५१ हजार, ५३ हजार, ७७ हजार व तब्बल एक लाख ६२९ असे एका दिवसात विक्रमी लसीकरण करून मुंबईनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर उच्चांक गाठत लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा: उत्सवाच्या उद्देशाला ‘सुलतानी’ हरताळ


१७ लाखांवर जणांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत १७ लाख तीन हजार २७६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात सात लाख २४ हजार ९२१ शहरी भागात, तर नऊ लाख २८ हजार ३५५ ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरणात सहभाग नोंदविला आहे. १२ लाख ७५ हजार ३९१ जणांचे पहिल्या टप्प्यात, तर चार लाख २७ हजार ८८५ नागरिकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण डोस पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ लाख २१ हजार ६९० एकूण लोकसंख्येपैकी २८ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

loading image
go to top