महिला व्यायामशाळांचा ‘अमळनेर पॅटर्न’ राज्यात राबविणार-  मंत्री पाटील 

उमेश काटे
Tuesday, 3 November 2020

पस्तीस वर्षाच्या राजकारणात नगरपालिकेत आमची २५ वर्षांपासून सत्ता आहे, पण असा उपक्रम पाहिला नाही. मुंबईमध्ये मोठ्या शहरांमध्ये असे उपक्रम बघायला मिळतात.

 
अमळनेर : महिलांना स्वत:चे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्ह्यातील प्रथम जिजाऊ महिला व्यायामशाळा व योगा हॉल, तसेच विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले अभ्यासिका येथील पालिकेच्या वतीने बांधण्यात आली असून, हा उपक्रम राज्यासाठी पथदर्शी आहे. त्यामुळे येत्या काळात हा ‘अमळनेर पॅटर्न’ राज्यातील पालिकांच्या माध्यमातून कसा राबविता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

आवर्जून वाचा- महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !
 

व्यायामशाळा व सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, ‘खाशि’चे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, डॉ. अपर्णा मुठे, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले, की तीस - पस्तीस वर्षाच्या राजकारणात नगरपालिकेत आमची २५ वर्षांपासून सत्ता आहे, पण असा उपक्रम पाहिला नाही. मुंबईमध्ये मोठ्या शहरांमध्ये असे उपक्रम बघायला मिळतात. महिला नगराध्यक्ष असल्यानेच हे शक्य झाले. माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या संकल्पनेतून अभ्यासिका व व्यायामशाळा साकारण्यात आली म्हणून या वेळी साहेबराव पाटील यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात ७८१ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर !
 

महिला सुरक्षीत राहणे महत्वाचे

नगराध्यक्षा श्रीमती पाटील म्हणाल्या, की सध्या महिला सुरक्षित राहणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी व्यायामशाळा व वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. संजय चौधरी यांनी आभार मानले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner 'Amalner Pattern' of women's gyms will be implemented in the state