कपाशीच्या पीकविम्यात पीक कापणीचा अडसर

साधारण जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा पेरणी (लागवड) कालावधी असतो.
cotton crop
cotton crop

पातोंडा (ता. अमळनेर) : पातोंडा व अमळगाव मंडळासह तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने विमा कंपनीने तत्काळ २५ टक्के विमा मंजूर करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र पीक कापणी कालावधीनंतरच विमा रक्कम देता येईल, असे जिल्ह्याच्या पीकविमा कंपनीने स्पष्ट केले आहे. इतर पिकांसाठी मात्र शासनाकडून आदेश आल्यास २५ टक्के रक्कम त्वरित दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पीकविम्यासाठी आता शासनाच्या आदेशाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

cotton crop
जळगावची चिंता वाढली; बोदवडला कोरोनाचे ५ रुग्ण सापडले

पीक कापणी कालावधी महत्त्वाचा
शासनाच्या धोरणानुसार खरिपातील पिकांसाठी कृषी मंडळात रोटेशन पद्धतीने दर वर्षी कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांकडे पीक कापणी तक्ते दिले जातात. साधारण जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा पेरणी (लागवड) कालावधी असतो. खरिपातील मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा कापणी कालावधी २५ ते ३० ऑगस्टदरम्यान असतो. कापूस पिकाचा कापणी कालावधी १० नोव्हेंबर ते २० डिसेंबर हा असतो. कृषी विभागाचा कापणी प्रयोग तक्ता पूर्ण झाल्याशिवाय कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे समजत नाही.

दुसरा टप्पा कापणीनंतर द्यावा
खरिपातील मूग, उडीद या पिकांचा कापणी कालावधी २५ ते ३० ऑगस्टदरम्यान असल्याने या पिकांचा पीकविमा लवकर मंजूर होण्यासाठी पीक कापणी कालावधी अडसर ठरण्याची होण्याची शक्यता आहे. मूग, उडीद व कापूस यासह सर्वच पिकांना तत्काळ २५ टक्के विमा मंजूर करावा व दुसरा टप्पा पीक कापणी कालावधीनंतर होणाऱ्या पिकांच्या नुकसानावर आधारित उर्वरित विमा रक्कम मंजूर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

मंडळनिहाय नुकसानीची सरासरी ठरवणे ही शासनाची अट चुकीची आहे. त्यामुळे ठराविक शिवारातील पिकांचे नुकसान होत असल्यास शेतकरी विमा लाभापासून वंचित राहतो म्हणून पीकविमा संरक्षण हे गावनिहाय नुकसानावर ठरवावे, अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
-दिलीप बोरसे, युवा शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य, पातोंडा

cotton crop
पीक पाहणी आता होणार मोबाइल अॅपवर!

अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या समितीची बैठक होऊन लवकरच शासनास अहवाल पाठविला जाईल. शासनाकडून ज्या पिकांचा विमा मंजूर होईल, त्यांची तीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांना २५ टक्के मंजूर रक्कम अदा केली जाईल. कपाशीबाबत पीक कापणी कालावधीच्या दहा दिवस आधी पाहणी करून निर्णय घेण्यात येईल. नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती भारती अॅक्सा विमा कंपनीच्या १८००-१०३-७७१२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा भारती अॅक्सा कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी, तालुका कृषी कार्यालय अमळनेर येथे प्रत्यक्ष लेखी स्वरूपात देऊ शकतात.
-प्रभासचंद्र, भारती अॅक्सा, जिल्हा व्यवस्थापक, जळगाव

मंडळनिहाय नुकसानीची सरासरी ठरवणे ही शासनाची अट चुकीची आहे. त्यामुळे ठराविक शिवारातील पिकांचे नुकसान होत असल्यास शेतकरी विमालाभापासून वंचित राहतो म्हणून पीकविमा संरक्षण हे गावनिहाय नुकसानावर ठरवावे, अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
-दिलीप बोरसे, युवा शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य, पातोंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com