आशां"कडून बेकायदेशीर पैश्यांची मागणी; ऑडीयो क्लिप व्हायरल

उमेश काटे
Saturday, 5 December 2020

शासनाच्या स्पष्ट सुचना आहेत. मात्र ही रक्कम सबंधित कार्यालयांनी आजपर्यंत आशांच्या बँक खात्यात जमा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अमळनेर :  आशा सेविका या अल्प मानधनावर काम करून आपल्या कुटुंबाचा रहाट गाळा जेमतेम वाहत असतात. त्यातच "काही" कडून लहान मोठ्या कामासाठी नेहमीच पैशांची मागणी होते. याच धर्तीवर तालुक्यातील आशांकडून गणवेशाच्या रकमेतून गटप्रवर्तक यांच्या मार्फत वरिष्ठ हजार रूपये तसेच आशांकडून टिम बेसच्या कामाच्या मोबदल्यातूनही बेकायदेशीरपणे पैश्यांची मागणी केली जात आहे. मागणी केल्याच्या "ऑडीयो क्लिप" ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

वाचा- आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने -

राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी या वर्षापासून बाराशे रुपये देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर आशा व गटप्रवर्तक यांनी दोन साड्या अर्थात गणवेश खरेदी करून बिल सादर करावे. असे शासनाच्या स्पष्ट सुचना आहेत. मात्र ही रक्कम सबंधित कार्यालयांनी आजपर्यंत आशांच्या बँक खात्यात जमा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. गणवेशाचा रकमेतून तालुक्यातील आशांकडून गटप्रवर्तकामार्फत वरिष्ठ हजार रूपये मागणी करत आहेत. विशेष म्हणजे आशांकडून टिम बेसच्या कामाच्या मोबदल्यातूनही सुमारे 2678 रूपये बेकायदेशीरपणे पैश्यांची मागणी केली जात आहे.

वाचा- दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन पाठींब्यासाठी ‘राष्ट्रवादी’ची तीव्र निदर्शने -
 

मागणीच्या संभाषणाच्या ऑडीयो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तरी आशांकडून बेकायदेशीर पैसे मागणाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आशांवर दबावतंत्राचा वापर करून पैसे कोणाच्या आशिर्वादाने जमा केले आहेत याचीही चौकशी करावी या मागणी ला खतपाणी मिळत दिले जात आहे. संबंधित संभाषणाच्या ऑडियो क्लिप या मंत्रालयासह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील यांनाही पाठवल्या असल्याचे समजते. आशांकडून बेकायदेशीर जमा केलेले पैसे परत मिळावेत तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner illegal demand for money from asha seviks