esakal | स्कोअर २४..तरीही अन्वरदादांची जिद्द जिंकली

बोलून बातमी शोधा

corona
स्कोअर २४..तरीही अन्वरदादांची जिद्द जिंकली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : आपण म्हणतो ना ‘देव तारी त्याला कोण मारी’... एका बाजूला कोरोनाचा मृत्युदर वाढत आहे, तसेच रेमडेसिव्हिरचा वापर करूनदेखील रुग्ण दगावल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. रोज मृत्यूच्या घटना ऐकायला मिळत असल्या तरी सकारात्मक विचार व जिद्दीच्या बळावर आपण कोरोनाला हरवू शकतो, याचे उदाहरण अमळनेरला पाहायला मिळाले.

हेही वाचा: जि.प.अध्यक्षांचे पतीसह स्पेशल लसीकरण ! आणि भाजप कार्यकर्त्यांचा घरचा आहेर

तांबेपुरा भागातील अन्वर पिंजारी यांना घरी असताना ताप आणि थंडी वाजून आली. नंतर स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन व गोळ्या घेऊन ते घरीच थांबले. दोन-तीन दिवस बरे वाटल्यामुळे घरीच आराम केला; परंतु त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. पाच ते सहा दिवस घरीच अंगावर काढल्यामुळे एक दिवस अचानक त्यांची तब्येत खराब झाली. त्यांच्या पत्नी नौशादबी यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितले. प्रभागातील काही नागरिकांनी त्या काकांना हॉस्पिटलमध्ये पाठविले. कोणीही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास तयार होत नव्हते. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात बेडची कमतरता होती.

हेही वाचा: भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध

ताप असल्यामुळे त्यांची कोविड चाचणी केली असता त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शहरातील एका डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी त्यांना एचआरसीटी करून घ्या, असे सांगितले. एचआरसीटी केला तर डॉक्टरदेखील अवाक् झाले. कारण रुग्णाचा सीटी स्कॅन स्कोअर २५ पैकी तब्बल २४ आला होता. डॉक्टरांनी नौशादबी यांना बोलावले व सांगितले, की यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे यांना त्वरित व्हेंटिलेटर लागेल. आमच्या दवाखान्यात व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्यामुळे आम्ही दाखल करू शकत नाहीत, तुम्ही यांना इतरत्र घेऊन जाऊ शकता. पत्नी खूप घाबरल्या. त्यांनी आपल्या मुलांना कळविले. मुलांनी त्यांच्या मित्रांना फोन केले. सर्व मित्र हॉस्पिटलमध्ये बेड शोधण्यासाठी फिरत होते. इकडे अन्वरकाकांची तब्येत खराब होत होती आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार होती. मित्रांच्या प्रयत्नांनी अमळनेरमधील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. डॉ. मनीष चव्हाण यांनी रुग्णाची तपासणी करून दाखल करून घेतले. डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत होते, परंतु एचआरसीटी २४ असल्यामुळे फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला होता, तसेच ऑक्सिजनदेखील फक्त ६५ येत होता. परंतु अन्वर पिंजारी यांची रोगप्रतिकारशक्ती व जगण्याची उमेद अफाट होती. रोज ते डॉक्टरांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने अन्वरकाका हळूहळू बरे होऊ लागले आणि तब्बल २० दिवसांनंतर डिस्चार्ज घेऊन अन्वर पिंजारी ठिकठाक होऊन घरी पोचले.

दोन्ही मुले सैन्यदलात
तांबेपुरा भागात राहणाऱ्या अन्वर पिंजारी यांची दोन्ही मुले सैन्यदलात आहेत. मोठा मुलगा सीआयएसएफ, तर लहान मुलगा असिफ बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांनादेखील वडिलांच्या प्रकृतीची चिंता सतावत होती. मात्र, मित्रांच्या सतत संपर्कात असल्याने व मित्रांनीदेखील संकटात पिंजारी कुटुंबाला साथ दिली.


हेही वाचा: जामनेरमध्ये पोलिसांचा ‘आयपीएल’ सट्टावर धाड; १४ जणांवर गुन्हे !

सकस आहारावर भर
२४ स्कोअर असल्यामुळे रेमडेसिव्हिरचा, तसेच इतर औषधांचा वापर करण्यात आला असला, तरी अन्वर पिंजारी यांची रोगप्रतिकारशक्तीदेखील महत्त्वाची असल्याचे डॉक्टरांचे मत होते. व्हेंटिलेटरची आवश्यकता मात्र भासली नाही. अन्वर पिंजारी यांनी सकस आहारावर भर देऊन डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषध घेणे सुरू ठेवले. या काळात त्यांच्या धर्मपत्नीची मोलाची साथ त्यांना मिळाली.

संपादन- भूषण श्रीखंडे