esakal | अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये शेतशिवार तुडुंब
sakal

बोलून बातमी शोधा

अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये शेतशिवार तुडुंब

अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये शेतशिवार तुडुंब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


अमळनेर : तालुक्यात काही दिवसांपासून पावसाची संततधार (Heavy Rain) सुरू असून, ओल्या दुःष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पातोंडा, मठगव्हाण, रुंधाटी, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा शिवारात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेत तुडुंब भरली आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी (Farmers) चिंताग्रस्त झाले आहेत. या शिवाराची आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी पाहणी केली.

हेही वाचा: अभियंता दिन विशेष:दोन दशकांपूर्वी ठरले‘मेक इन इंडिया’चे पायोनिअर

अनेक वर्षांपासून पर्जन्यमान कमी असले, तरी या भागातील शेतजमीन पावसामुळे पूर्ण पाण्याने भरून जाते. गेल्या वर्षी आमदारांनी या भागातील शेतजमिनींचा सर्व्हे करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व यंत्रणाही सोबत होती. या भागातील सर्व्हे करून पातोंडा व सावखेड्याच्या नाल्यांमध्ये हे पाणी कसे वळवता येईल, तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पाटचाऱ्यांचे सिंचन विभागाच्या माध्यमातून खोलीकरण करता येईल व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींच्या माध्यमातून शेतातील पाणी बाहेर काढता येईल, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा झाली होती.

हेही वाचा: दारू विक्रेत्यांशी वाद..रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्त्या


पर्जन्यमान व शासनाच्या नियमानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा पाऊस जास्त असला, तर शेतीतील पिकांचे पंचनामे करता येतात. मात्र, या भागात पर्जन्यमान कमी असले, तरी पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते व पिकांचे नुकसान होते. यामुळे या भागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या शेतजमिनींचा पंचनामा करावा, तसा प्रस्ताव व निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. भविष्यात या भागातील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा कसा होईल व लोकांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून संबंधित विभागातील यंत्रणेशी संपर्क झाला आहे. लवकरात लवकर या भागाचे सर्वेक्षण होऊन व संबंधित विभागांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल, असे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top