esakal | अमळनेरातील १०५ फुटी तिरंगाची प्रतीक्षाच !
sakal

बोलून बातमी शोधा

अमळनेरातील १०५ फुटी तिरंगाची प्रतीक्षाच !

अमळनेरातील १०५ फुटी तिरंगाची प्रतीक्षाच !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे प्रतीक आहे. अमळनेर नगरपरिषदेने माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या संकल्पनेतून धुळे - अमळनेर - चोपडा राज्यमार्ग १५ वरील सुशोभीकरण व विद्युतीकरण झालेल्या कारंजा चौकात १०५ फुट उंचीचा राष्ट्रध्वजस्तंभ उभारण्यात आला असून, त्यावर २० बाय ३० फूट आकारमानाचा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

हेही वाचा: रेल्वेने ऐनवेळी निर्णय बदल्ला..आणि केळी कापणी ठप्प !

खरे तर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनी समारंभपूर्वक उभारणी केलेल्या राष्ट्रध्वजाचा अनावरण सोहळा आयोजित करण्याचा आदेश होता. तथापि, राज्यात कोरोनाबधितांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू आहेत. त्यामुळे गतवर्षाप्रमाणेच राज्यात महाराष्ट्र दिन समारंभ साधेपणाने फक्त जिल्हा मुख्यालयातच ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यामुळे नगरपरिषदेतर्फे कारंजा चौकातील उभारणी करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा अनावरण सोहळा स्थगित करण्यात आला, असे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष, सभापती, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी कळविले आहे.

नियमावलीचे पालन

राष्ट्रध्वज बनविण्याची व फडकवण्याची काही विशिष्ट अशी नियमावली आहे. झेंडा ९९ फूट उंचीवर असेल तर झेंड्याला रोज सायंकाळी खाली उतरवावे लागते, पण शंभर फुटाच्या वर असेल तर झेंडा कायमस्वरूपी फडकता असतो. झेंड्याला सायंकाळी खाली उतरविण्याची गरज नसते. झेंडा कायम प्रकाशझोतात ठेवावा लागतो. त्यासाठी जनरेटरची सोय करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहिता २००६ अन्वये कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

कोरोनामुळे ध्वजारोहण कार्यक्रम पुन्हा एकदा स्थगित झाला असला तरी शासनाने परवानगी दिल्यावर १०५ फुटावर अमळनेरला लवकरच तिरंगा फडकेल, अशी आशा आहे. यामुळे अमळनेरच्या सौंदर्यात भर पडून अमळनेरचा लौकिक वाढण्यास मदत होईल.

- कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार, अमळनेर

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image