esakal | रेल्वेने ऐनवेळी निर्णय बदल्ला..आणि केळी कापणी ठप्प !
sakal

बोलून बातमी शोधा

 banana wagons

रेल्वेने ऐनवेळी निर्णय बदल्ला..आणि केळी कापणी ठप्प !

sakal_logo
By
प्रविण पाटील

सावदा : येथील रेल्वेस्थानकावरील जीएस दर्जाचे सहा वॅगन्स अचानक रद्द करून त्या रावेर रेल्वेस्थानकावरून भरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे सावदा परिसरातील केळी उत्पादकांवर हा अन्याय असून, या निर्णयामुळे केळी कापणी व वाहतूक ठप्प झाली आहे. लॉकडाउनमुळे केळीच्या बाजारभावात घसरण झाल्याने आधीच अडचणीत असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

हेही वाचा: दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

जीएस वॅगनवर तोडगा निघावा, यासाठी दोन एप्रिलला मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत केळी व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक झाली व तोडगा काढून सावदा रेल्वेस्थानक येथे सहा तर रावेर रेल्वेस्थानक येथे बारा अशी वॅगन वाटप करण्यात आली होती. तसे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील व्यवस्थापनाला देखील कळविण्यात आले होते. सावदा रेल्वेस्थानकावर सहा जीएस वॅगन मिळतील, असा निर्णय झाला असताना माशी नेमकी शिंकली तरी कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केळी वाहतुकीत रेल्वे आणि लोकप्रतिनिधी राजकारण तर करीत नाही ना? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा: जळगावकरांच्या तक्रारींचे घरबसल्या निरसन

सहाशे क्विंटल केळी कापणी ठप्प

सावदा रेल्वेस्थानकावरून भरली जाणारी जीएस वॅगन्स रद्द केल्याने सावदा परिसरातील सहाशे क्विंटल केळी कापणी ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. आता या रेल्वे वॅगन रद्द होऊन त्या रावेर येथून भराव्यात, या मागे एका केळी व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी राजकारण केले जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करा !

दिवसभर घाम गाळून शेतकरी केळी पिकवतो. ती योग्य वेळी कापणी होऊन विकून मालाचे दाम मिळेल. या आशेवर तो असतो. पण सावदा रेल्वेस्थानकावरील नियोजित जीएस वॅगन रद्द झाल्याने केळी कापणी ठप्प झाली आहे. केळी व्यवसायात राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. सावदा येथील वॅगन रद्द करण्यामागे लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे, अशी चर्चा आहे. तरी या पुढे तसे करू नये व सावदा येथील हक्काच्या जीएस वॅगन पुन्हा उपलब्ध करून द्याव्यात.

- अमोल पाटील, केळी उत्पादक शेतकरी.

loading image