जळगावः तिकिट तपासणीत १०० कोटींचा दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tickets

जळगावः तिकिट तपासणीत १०० कोटींचा दंड वसूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : मध्य रेल्वेने (Central Railway) १ एप्रिल ते ६ नोव्हेबर २०२१ दरम्यान तिकिट (Tickets) तपासणीत १००.८२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यात अनियमित प्रवास करणाऱ्या २९ हजार १९ प्रवाशांकडून १७.२२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. त्याच्यावर कोरोनानुसार (Corona) कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: NCB ची मोठी कारवाई, जळगावातून जप्त केला 1500 किलो गांजा


मध्य रेल्वेने शासनाच्या कोविड-१९ नियमांचे पालन करत प्रवाशांना प्रवासादरम्यान सुरक्षित व जागरूक केले आहे. नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत भुसावळ विभागाने ४.६८ लाख प्रकरणात ३३.७४ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. मुंबई विभागाने ६.८३ लाख प्रकरणात (३३.२० कोटीरुपये), नागपुर विभाग २.५१ लाख प्रकरणात (१६.७३ कोटी रुपये) आणि सोलापुर, पुणे विभागात ३.२० लाख प्रकरणात (१७.१५ कोटी) रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. १ एप्रिल ते ६ नोव्हेंबर दरम्यान, तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या विशेष पथकांनी कोविड-१९च्या नियमांचे पालन न करणार्‍या २९ हजार १९ प्रकरणात हा दंड वसुल करण्यात आला.

तोंडावर मास्क, फेस कव्हर न घातलेल्या २३ हजार ८१६ प्रकरणे, कोविड-१९निर्देशांचे पालन न करणार्‍या ५ हजार २०३ प्रकरणे अशा एकुण अनुक्रमे ३९.६८ लाख रुपये आणि २६.०२ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

हेही वाचा: जळगाव : काँग्रेसतर्फे जनजागरण अभियान


मध्य रेल्वेचे प्रवाशांना चांगील्या सुविधा देण्यासाठी व विना तिकिट प्रवास करणार्‍यांवर आळा घालण्यासाठी नियमित प्रयत्न होत आहे. मेल एक्सप्रेस व स्पेशल गाड्यांमध्ये तिकिट तपासणी मोमिह गांभिर्याने राबविण्यात येत आहे. प्रवाशांनी योग्य तिकिट काढून तसेच कोविड -१९ च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top