भंगार विक्रीतून कमावले ३९१.४३ कोटी;मध्य रेल्वेचे झिरो`स्क्रॅप`मिशन

गेल्या १५ वर्षात ही भंगार विक्रीतून झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे.
Train Scrap
Train Scrap
Updated on
Summary

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने "झिरो स्क्रॅप मिशन" सुरू केले आहे.


भुसावळ : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे (Corona Crisis) रेल्वेची देशभरातील प्रवासी वाहतूक जवळपास ठप्प असल्यात जमा होती. त्यामुळे रेल्वेला प्रवासी वाहतुकीसाठी मिळणारे मोठे उत्पन्न बुडाले आहे. मात्र, याचा काळात रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री (Train Scrap) करुन मोठे उत्पन्न मिळवले आहे. २०२०-२१ या वर्षात भारतीय रेल्वेने (Indian Railways) भंगार विक्रीतून ३९१.४३ कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या १५ वर्षात ही भंगार विक्रीतून झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे.

Train Scrap
अ‍ॅड.पाटील हे जेष्ठ संचालक त्यांचा राजीनामा नामंजूर-रोहिणी खडसे


मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने "झिरो स्क्रॅप मिशन" (Train Zero Scrap Mission) सुरू केले आहे. रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिनं, त्यांच डब्बे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्याप्रमाणावर भंगार निघते. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलावप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले. आणि ३९१.४३ कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे. रेल्वे खात्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४०० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
-

Train Scrap
अमळनेरमध्ये १०५ फुटांवर फडकला "तिरंगा"


भंगार विक्रीतून महसूल वाढ

मध्य रेल्वेने ८.६५ कोटी रुपयांच्या कमाईसह ई -ऑक्शनद्वारे "जसे आहे तिथे आहे" तत्वावर वापरात नसलेल्या संरचनांची विल्हेवाट लावली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही, तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले की, रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल. या आर्थिक वर्षात, रेल्वे लाभार्थ्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजन जनरेटर प्लांटसह कोविड वस्तूंच्या खरेदीची व्यवस्था करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com