esakal | खासगी शाळांची मनमानी कारभार..शुल्क वसुलीचा तगादा
sakal

बोलून बातमी शोधा

School

खासगी शाळांची मनमानी कारभार..शुल्क वसुलीचा तगादा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : कोरोना (Corona) संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन (Online) पद्धतीने शिक्षण होत आहे. काही शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली सक्तीने शुल्कवसुली करायला सुरुवात केली आहे. सोमवारपासून शाळा सुरू झाल्याने पुन्हा शाळांनी प्रवेश शुल्क वसुली सुरू केली आहे. शुल्क न भरल्यास नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन ग्रुपमधून काढली जात आहेत. यासर्व प्रकरणी शिक्षण विभाग (Department of Education) मात्र याप्रकरणी ‘अर्थ’पूर्ण मौन बाळगून आहेत.

हेही वाचा: पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने उसळली दंगल


कोरोनामुळे राज्यातील कोणत्याच शाळेने शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेचे चालू वर्षाचे आणि आगामी वर्षाचे शुल्क गोळा करताना सहानुभूती दाखवणे आवश्यक राहील, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले होते. यानंतरही शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली करण्यात येत आहे. आता शाळा सुरू झाल्याने शहरातील बऱ्याच शाळांनी पालकांना मोबाईल व व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे पुन्हा शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे.


कोरोनामुळे अनेक पालकांचे उत्पन्न कमी झाले आहे. यामुळे एकाच वेळी शुल्क कसे भरता येईल? याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे पालकांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी साधारण चार टप्पे देण्यात यावेत, असा सूरही पालकांमधून आहे. मात्र, शाळांकडून संपूर्ण शुल्क एकदाच किंवा दोन टप्प्यांत भरण्याची सक्ती केली जात आहे. पालक शाळांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी घाबरत असल्याने, सर्व दडपशाही सुरू आहे. शिक्षण विभागाकडे मात्र तक्रारी नसल्याने आडदांडपणे शुल्क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई देखील होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Jalgaon : खडसे-महाजन वादामुळे सर्वपक्षीय पॅनल वांध्यात


साठ टक्के शुल्क कमी करावे
शहरातील खासगी सीबीएसई व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी यंदा १५ टक्के शुल्क कमी करून दिले. मात्र, दरवर्षी शुल्कात दिले जाणारे पाठ्यपुस्तके यंदा पालकांना विकत घ्यावी लागली. यामुळे १५ टक्के कमी करून देण्याचा फायदा झाला नाही. शाळा बंद असल्याने शाळा प्रशासनाचा वीज, पाणी व इतर खर्च वाचला. यामुळे शुल्क किमान ६० टक्यांनी कमी करावे, अशीही

loading image
go to top