भुसावळचे आमदार कोरोना पॉझिटीव्ह

mla sanjay savkare
mla sanjay savkare

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार संजय सावकारे यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. नगराध्यक्षानंतर आता आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

राज्याचे पावसाळी अधिवेशन आटोपून आलेल्या आमदार सावकारे यांनी अँन्टीजन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आला. यानंतर ते गोदावरी रुग्णालयात सोमवारी (ता. १४) उपचारार्थ दाखल झाले आहेत. यादरम्यान आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी व घाबरून जाण्याचे कारण नाही निश्‍चितपणे आजारावर मात करता येते, असे आवाहन आमदार सावकारे यांनी केले आहे. नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता आमदार संजय सावकारे यांचा अँन्टीजन टेस्ट अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी देखील आमदारांनी कोरोना चाचणी केली होती. मात्र अधिवेशनाहून परतल्यानंतर त्यांना शंका वाटल्याने त्यांनी पुन्हा चाचणी केल्याने अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com