नऊ उत्सव विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार !

नऊ उत्सव विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार !

भुसावळ ः आगामी सण, उत्सवांदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्यात येणार आहे.

दिवाळी, दसरा सण काही दिवसावरच आले असून गावी जाणाऱया प्रवाशांची देखील गर्दी  वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविसेधासाठी नऊ उत्सव विशेष एक्सप्रेस गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. 

कन्फर्म तिकिट असणाऱयांनाच प्रवेश

या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित व कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवाणगी असेल तसेच कोविडच्या निमांचे पालन करावे लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

असा आहे गाड्यांचे वेळापत्रक

उधना मंडूहादिह साप्ताहिक विशेष - गाडी क्र. 09057 डाउन उधना मंडूहादिह साप्ताहिक विशेष गाडी 23 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान, दर मंगळवारी सकाळी 8.20 वाजता उधना स्थानकावरुन रवाना होऊन दुसर्‍या दिवशी पहाटे 1.40 वाजता मंडूहादिह पोहोचेल. गाडी क्र. 09058 अप मंडूहादिह उधना साप्ताहिक विशेष गाडी ही 25 ऑगस्ट ते 29 नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी पहाटे 4.50 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी 9 वाजता उधना पोहोचेल. 

बांद्रा टर्मिनस सहरसा साप्ताहिक विशेष हमसफर- गाडी क्र. 02913 डाउन बांद्रा टर्मिनस सहरसा साप्ताहिक विशेष हमसफर गाडी 25 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत दर रविवारी दुपारी 12.55 वाजता रवाना होऊन पहाटे 3.55 वाजता सहरसा पोहोचेल. गाडी क्रमांक 02914 अप सहरसा- बांद्रा टर्मिनस साप्ताहिक विशेष हमसफर गाडी 27 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरपर्यंत दर मंगळवारी सहरसा येथून दुपारी 4.45 वाजता रवाना होऊन सकाळी 7.35 वाजता बांद्रा टर्मिनस पोहोचेल. 

बांद्रा टर्मिनस पटना साप्ताहिक विशेष- गाडी क्रमांक 09271 डाउन बांद्रा टर्मिनस पटना साप्ताहिक विशेष गाड़ी 26 ऑक्टोबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन दुपारी 4:35 वाजता रवाना होइल आणि दुसरया दिवशी पटना स्टेशन ला 02:05 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 09272 अप पटना - बांद्रा टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी 28 ऑगस्ट ते 2 डिसेंबर दरम्यान दर बुधवारी पटना येथून रात्री 11.10 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी सकाळी 7.35 वाजता बांद्रा टर्मिनस पोहोचेल. 
उधना छपरा विशेष - गाडी क्र. 09019 डाउन उधना छपरा विशेष गाडी 25ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी सकाळी 11.55 वाजता रवाना होऊन तिसर्‍या दिवशी सकाळी 6.15 वाजता छपरा पोहचेल. गाडी क्र. 09020 अप छपरा - उधना विशेष 27 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी सकाळी 7.50 वाजता रवाना होउन दुसर्‍या दिवशी दुपारी 12.15 वाजता उधना पोहचेल. 

पोरबंदर हावडा विशेष ओखा हावडा लिंक विशेष- गाडी क्र.09205 डाउन पोरबंदर हावडा विशेष 21 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत दर बुधवार, गुरुवारी 8 वाजता रवाना होऊन तिसर्‍या दिवशी पहाटे 3.35 वाजता हावडा पोहोचेल. गाडी क्र. 09206 अप हावडा - पोरबंदर साप्ताहिक विशेष गाडी 23 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत रात्री 10.50 वाजता रवाना होऊन तिसर्‍या दिवशी सायंकाळी 6.10 वाजता पोरबंदर पोहोचेल. 
भुवनेश्वर लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष- गाडी क्रमांक 02880 अप भुवनेश्वर एलटीटी विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान, दर सोमवार, गुरुवारी सकाळी 7.10 वाजता रवाना होऊन दुपारी 1.35 वाजता एलटीटी पोहचेल. गाडी क्र. 02879 डाउन एलटीटी- भुवनेश्वर विशेष गाडी 24 आक्टोबर ते 2 डिसेंबरपर्यंत दर बुधवार, शनिवारी मध्यरात्री 12.15 वाजता रवाना होऊन मध्यरात्री 12.15 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी सकाळी 7.10 वाजता भुवनेश्वर पोहचेल. 


पूरी एलटीटी विशेष- गाडी क्र. 02866 अप पूरी एलटीटी विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी 5.25 वाजता रवाना प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य तिलक टर्मिनसला दुपारी 1.35 वाजता पोहचेल गाड़ी क्रमांक 02865 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस- पूरी विशेष गाड़ी ही 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत दर गुरुवार प्रस्थान स्टेशन हुन रात्री 12.15 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी पूरी ला 08.40 वाजता पोहचेल.गोरखपुर - लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष -गाड़ी क्रमांक 05018 अप गोरखपुर - लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाड़ी ही 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन हुन 05.30 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी 6.05 वाजता एलटीटी पोहचेल. गाडी क्र. 05017 डाउन एलटीटी - गोरखपुर विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत दररोज 6.35 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी सायं. 6.05 वाजता एलटीटी पोहचेल. 

गोरखपुर -मुंबई विशेष- गाडी क्र. 02597 अप गोरखपुर मुंबई विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी सकाळी 8.30 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी दुपारी 12.20 वाजता मुंबई पोहचेल. गाडी क्र. 02598 डाउन मुंबई - गोरखपुर विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी दुपारी 1.30 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6.35 वाजता गोरखपुर पोहचेल.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com