उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी रेल्वेवाहतुकीमुळे हातभार

railway transport luggage
railway transport luggage

भुसावळ : मध्य रेल्वे ने २३ मार्च ते ९ सप्टेंबरपर्यंत ४.४२ लाख वॅगनच्या माध्यमातून २३ हजार २२५ दशलक्ष टन मालवाहतूक केली. अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या १.६७ लाख भारित वॅगन्सची वाहतूक उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी, रेल्वेने कोविड-१९ कारणाने लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.

मध्य रेल्वेने २३ मार्च ते ९ सप्टेंबर या काळात २३ हजार २२५ दशलक्ष टन मालवाहतुकीची यशस्वी पूर्तता केली. ९ हजार २७९ मालगाड्या चालविल्या असून, त्यातून ४ लाख ४२ हजार ९४४ वॅगन्स भरून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व पोलाद, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची मालवाहतूक करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज सरासरी २ हजार ५९० वॅगन्सची मालवाहतूक केली गेली. मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या १ लाख ६७ हजार २३ वॅगन्स विविध वीज प्रकल्पांपर्यंत नेल्या.

तसेच अन्नधान्य आणि साखर ५ हजार १५५ वॅगन्स; शेतकऱ्यांच्या हितासाठी २० हजार ५४३ खतांची वॅगन्स व ६ हजार ५५५ कांद्याचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे ४३ हजार ८२४ वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या ११ हजार ७४७ वॅगन्स; सिमेंटची २८ हजार २९९ वॅगन्स; १ लाख ३७ हजार ७६० कंटेनर वॅगन्स आणि सुमारे २२ हजार ३८ डी-ऑईल केक आणि संकीर्ण वस्तूंचे वॅगन्स वाहून नेले.
मध्य रेल्वेवर क्षेत्रीय स्तरावर आणि विभागीय स्तरावर बहु-अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना रेल्वेने केली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेला हा
घटक रेल्वेमार्फत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधतो. यामुळे उद्योग क्षेत्रात मालवाहतुकीसाठी सोयीचे ठरत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com