लॉकडाउनमध्ये रेल्वेने बदलला उत्पन्नाचा ‘ट्रॅक’ !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनमध्ये रेल्वेने बदलला उत्पन्नाचा ‘ट्रॅक’ ! 

फ्रेट पॉलिसीमुळे एक हजार ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी प्रथमच कळमेश्वर ते आझरा (एनएफआर) कडबा, बडनेरा ते तमिळनाडूच्या पोलाची येथे सोयाबीज, खंडवा ते परभणीपर्यंत गहू लोडिंग करण्यात आले.

लॉकडाउनमध्ये रेल्वेने बदलला उत्पन्नाचा ‘ट्रॅक’ ! 

भुसावळ  : कोरोना महामारीमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउनमुळे अनेक क्षेत्रांत मंदी आली आहे. रेल्वे क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वे आता हळूहळू यातून सावरत ट्रॅकवर येत आहे. रेल्वेतर्फे ऑटोमोबाईल्स, शेतीसह अनेक खासगी ठिकाणी देशाबाहेरही सेवा दिली जात आहे. हा सर्व नवीन व्यवसाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमधील व्यवसाय विकास युनिटच्या सखोल विपणनामुळे शक्य झाला असून, यात भुसावळमधून बांगलादेशात मका तर रावेरमधून केळी आणि भादलीतून सिमेंटची वाहतूक करण्यात आली आहे.

आवश्य वाचा- जळगावचा रथोत्सवाचे भाविकांना मिळणार ऑनलाईन दर्शन 

मध्य रेल्वेने अलीकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास विभाग विविध मालवाहतूक संस्था, नवीन ग्राहक, व्यापारी संस्था आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेत आहेत. ‘बीडीयू’च्या या उपक्रमांमुळे नवीन व्यवसाय मिळाला आणि नव्या व्यवसायासाठी व्यापार आणि उद्योगाशी संबंध प्रस्थापित झाला. बिझनेस डेव्हलपमेंट युनिट स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींसोबत नवीन प्रस्तावांची आणि लवचिक योजनांची आक्रमकपणे जाहिरात करीत त्यांच्या मागण्या एकत्रित करते. 

प्रथमच बांगलादेशात निर्यात 
पुणे विभागातील बीडीयू टीम सतत संपर्क साधत असल्यामुळे येत्या पाच महिन्यांत वाहन वाहतुकीस मोठा वाव आहे. भारतीय रेल्वेने सादर केलेल्या मिनी रेकच्या आकर्षक नवीन फ्रेट पॉलिसीमुळे एक हजार ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी प्रथमच कळमेश्वर ते आझरा (एनएफआर) कडबा, बडनेरा ते तमिळनाडूच्या पोलाची येथे सोयाबीज, खंडवा ते परभणीपर्यंत गहू लोडिंग करण्यात आले. भुसावळ गुडशेडवरून दर्शना (बांगलादेश) येथे प्रथमच मका निर्यातीसाठी तीन इंडेंट करण्यात आली. नागपूर विभागात चार वर्षांनंतर गव्हाची वाहतूक बेतुल गुडशेड येथून पुन्हा सुरू झाली. अजनी ते फिलौर, फिरोजपूरसाठी ट्रॅक्टर लोडिंग, तसेच बादली येथून गुना, जामनगरला जाण्यासाठी सिमेंट लोडिंग या नव्या ठिकाणासाठी झालेली आहे. रावेर, सावदा आणि निंभोरा येथून केळीची वाहतूक करण्यासह फ्रेट, पार्सल लोडिंग इंडेंटमध्ये वाढ होत आहे. बीडीयूच्या प्रयत्नांना बळ म्हणून बडनेरा स्टेशन कायमस्वरूपी पार्सल वाहतुकीसाठी उघडण्यात आले आहे. बांगलादेश व इतर ठिकाणी कापड, कापूस, बियाणे आणि धाग्याच्या वाहतुकीसाठी हिंगणघाट हे पार्सल टर्मिनल म्हणून उघडले गेले आहे. आवर्जून

वाचा- जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांना १९ कोटी नऊ लाखांची मदत जाहीर 

किसान रेलमुळे फायदा 
मुंबई विभागातील बिझनेस डेव्हलपमेंट युनिटने २३ ‘एनएमजी’द्वारे कळंबोली ते बेनापोल येथे ऑटोमोबाईलचे लोडिंग नुकतेच सुरू केले आहे. स्टील पाइप्सचा एक रेक नागोठणे ते तिनसुकियासाठी भरला गेला. पुणे विभागातील बिझनेस डेव्हलपमेंट युनिटने त्यांच्या अथक प्रयत्नातून ऑटोमोबाईल वाहतुकीस पुन्हा आपल्याकडे आकर्षित करीत मालवाहतुकीत प्रचंड वाढ केली आणि एकूणच कामगिरी आणि विभागाच्या उत्पन्नात भर पाडली. ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या या आर्थिक वर्षातील मागील सात महिन्यांत, ४६ एनएमजी रॅक्समध्ये ऑटोमोबाईलची वाहतूक केली गेली, जी २०१९-२०२० च्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या ऑटोमोबाईल लोडिंगच्या कामगिरीइतकी आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Web Title: Marathi News Bhusawal Railways Lockdown Change Source Income

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top