मुंबई, पुण्याहून धावणार सहा जोडी विशेष रेल्वेगाड्या

चेतन चौधरी 
Friday, 9 October 2020

मुंबई आणि पुण्यातून सहा जोडी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळ : रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वेने मुंबई आणि पुण्यातून सहा जोडी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाड़ी या विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील.

आवश्य वाचा- लग्नात आता वाजणार बँड, पण नियमांचे पालण करून !
 

गाडी क्रमांक – 01417 डाउन पुणे –नागपुर हमसफ़र विशेष गाड़ी ही 15 ऑक्टोबर पासून दर गुरुवार प्रस्थान स्टेशन रात्री दहाला रवाना होइल आणि दुसर्या दिवशी नागपुर ला दुपारी एकला पोहचेल . ही गाडी शुक्रवार - मनमाड -3.35, चाळीसगांव – 3.39,भुसावळ – 6.30, अकोला -8.38 , बडनेरा – 10.18 येथे थांबेल.

गाड़ी क्रमांक – 01418 अप नागपुर - पुणे हमसफ़र विशेष गाड़ी ही 16 ऑक्टोबर पासून दर शुक्रवार ला दुपारी तिनला रवाना होइल आणि दुसर्या दिवशी पुणे ला सकाळी 8.05 वाजता पोहचेल . गाड़ी क्रमांक- 02239 डाउन पुणे –अजनी एसी विशेष गाड़ी 17 ऑक्टोबर पासून दर शनिवार ला रात्री दहाला रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अजनी येथे दुपारी एकला पोहचेल . रविवारी मनमाड - 3.35, चाळीसगांव – 3.39, भुसावळ – 6.30,अकोला -8.38 , बडनेरा –10.18 पोहचेल.

गाड़ी क्रमांक- 02240 अप अजनी - पुणे –एसी विशेष गाड़ी 18 ऑक्टोबर पासून दर रविवारी रात्री 7.50 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी पुणे ला 11.45 वाजता पोहचेल . शुक्रवारी - बडनेरा –रात्री 10.33 अकोला -11.38 सोमवार -भुसावळ – 1.55, चाळीसगांव – 3.19, मनमाड – 4.40 पोहचेल.

आवर्जून वाचा- घरपट्टी पाणीपट्टीच्या थकबाकीने धुळे तालुक्यातील साठ गावांचा विकास खुंटला 
 

गाड़ी क्रमांक- 02117 डाउन पुणे–अमरावती एसी विशेष गाड़ी 14 ऑक्टोबर पासून दर बुधवार दुपारी 3.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अमरावती पहाटे 3.15 ला वाजता पोहचेल.

ही गाडी मनमाड - 8.30 , जळगाव –22.08 , भुसावळ – 8.40 गुरुवार - अकोला - रात्री 12.50 , बडनेरा – 2.30 वाजता येईल. गाड़ी क्रमांक- 02118 अप अमरावती – पुणे एसी विशेष गाड़ी ही 15 ऑक्टोबर पासून दर गुरुवार सायंकाळी 6.35 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अमरावती ला सकाळी 7.40 वाजता पोहचेल. ही गाडी भुसावळ – रात्री 9.45, जळगाव – 10.38 वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक- 02223 डाउन पुणे –अजनी विशेष गाड़ी ही 16 ऑक्टोबर पासून दर शुक्रवार दुपारी 3.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अजनी ला 5.15 वाजता पोहचेल.

गाड़ी क्रमांक- 02224 अप अजनी - पुणे विशेष गाड़ी ही 13 ऑक्टोबर पासून दर मंगळवार रात्री 7.50 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी पुणे ला 11.45 वाजता पोहचेल . गाड़ी क्रमांक – 01039 डाउन कोल्हापुर –गोंदिया विशेष गाड़ी ही 11 ऑक्टोबर पासून दररोज प्रस्थान स्टेशन दुपारी 3.20 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी गोंदिया ला पोहचेल. गाड़ी क्रमांक – 01040 अप गोंदिया – कोल्हापुर गाड़ी 13 ऑक्टोबर पासून दररोज प्रस्थान स्टेशन सकाळी 8.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी कोल्हापुर 12.50 ला वाजता पोहचेल.

वाचा- एक अधिकारी आणि तब्बल नऊ गावांचे कारभारी !
 

गाड़ी क्रमांक – 01141 डाउन मुंबई – नांदेड विशेष गाड़ी ही 11 ऑक्टोबर पासून दररोज प्रस्थान स्टेशन दुपारी 4.35 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी नांदेड पहाटे 5.30 ला वाजता पोहचेल. ही गाडी नाशिक, लासलगांव, मनमाड येथे थांबेल. गाड़ी क्रमांक – 01142 अप नांदेड - मुंबई ही 12 ऑक्टोबर पासून दररोज प्रस्थान स्टेशन सायंकाळी 5 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी मुंबई पहाटे 5.35 वाजता पोहचेल.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Six trains will run from Mumbai to Pune to avoid congestion