वरखेड्यात पून्हा बिबट्याचा थरार..सावजची चौथ्या दिवशी केली शिकार

Leopard attack
Leopard attack

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : गेल्या तीन दिवसापासून तो सावजावर टपून बसला होता,पण शिकार (Hunting) टप्प्यात येत नव्हती. मात्र चौथ्या दिवशी त्याने भरभक्कम लोखंडी जाळी तोडून आत उडी टाकून वासरुची शिकार केलीच. वरखेडे (ता.चाळीसगाव) शिवारात दरेगाव रस्त्यालगत शेतात (Farme) आज पहाटे बिबट्याच्या हल्ल्याचा (Leopard attacks) थरार समोर आला आणि पुन्हा परिसर बिबट्याच्या (Leopards) दहशतीने खळबळ उडाली आहे.

Leopard attack
पितापुत्रास नडली स्टंटबाजी..हातात रायफल आणि तलवार


वरखेडे (ता चाळीसगाव)येथील दरेगाव रस्त्यावरील राजेंद्र भावसिंग कच्छवा यांच्या शेतात गुरांसाठी लोखंडी जाळीला ठिबकच्या नळ्यांनी बांधून जाळी बंदिस्त करण्यात आली होती. असे असतांना आज पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास बिबट्या आला व त्याने लोेखंडी जाळीला बांधलेल्या ठिबक नळ्या तोडांने कतरुन जाळीत झेप घेतली व तेथे बांधलेल्या वासरूला ओढून नेले. विशेष म्हणजे बिबट्याचा हा थरार श्री कच्छवा यांनी पहिला परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्या शेतशिवारातुन देखील जातांना पाहील्यावर व या भितीमुळे कोणी पुढे आले नाही.

Leopard
Leopard


तीन दिवसापासून शिकारीवर टपून

विशेष म्हणजे बिबट्या गेल्या तीन दिवसापासून राजेंद्र कच्छवा यांच्या शेतात जेथे गुरे बांधलेली असतात तेथे रात्रीच्या सुमारास येत होता.बिबट्या येताच दावणीला बांधलेली गुरे दावण तोडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शेत मालकांच्या हा प्रकार लक्षात आलाच नाही. परंतू आज पहाटे बिबट्याने जाळीत उडी टाकून वासरूचा फडशा पाडल्यानंतर बिबट्याच्या रहीवासाचा उलगडा झाला. तीन दिवस बिबट्याला काही करता आले नाही, आज चौथ्या दिवशी संधी मिळताच बिबट्याने शिकार साधली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वन विभाागाला देण्यात आल्यानंतर संजय चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

Leopard attack
खड्डेमय रस्ते प्रश्नी जळगावात राष्ट्रवादी आक्रमक..

हल्ल्याची तिसरी घटना

दरेगाव रस्त्यावरील बिबट्याच्या हल्ल्याची श्री कच्छवा यांच्या शेतातील ही तिसरी घटना आहे.यापूर्वीही दोन घटनांमध्ये बिबट्याने वासरूंचा फडशा पाडला होता. चार वर्षापूर्वी याच भागात नरभक्षक बिबट्याने महिलेवर हल्ला केला होता,त्यात महिलेचा मृत्यु झाला होता.त्या घटनेच्या स्मृती अद्याप समोरून गेल्या नसतांनाच पुन्हा या भागात पुन्हा बिबट्याचा संचार दिसू लागल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com