esakal | चाळीसगावला पुन्हा सावधानतेचा इशारा..ओल्या दुष्काळाचे ही संकट
sakal

बोलून बातमी शोधा

Flood Alert

चाळीसगावला पुन्हा सावधानतेचा इशारा..ओल्या दुष्काळाचे ही संकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मेहुणबारे : चाळीसगाव तालुक्यात सर्वदूर जोरदार (Heavy Rain) पाऊस पडत असून नदी, नाले तसेच प्रकल्पामधील पाण्याची पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांने पुर पुण्या येण्याचा इशारा (Flood Alert) दिला आहे. तर मेहूणबारे, खडकीसीम, वरखेडे भागात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. खडकीसीम आणि मेहूणबारे या गावांचा संपर्क नाल्याला आलेल्या पुरामुळे रात्रभर तुटला होता. अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतांमध्ये पाणी घुसले असून आता ओल्या दुष्काळाचे संकट (drought crisis) घोंगावू लागले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सज्जता


जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट येते की काय, अशी शक्यता असतानाच पावसाचे आगमन झाले, त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले त्यानंतर मात्र पावसाचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून बसत आहे. रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांना जबर फटका बसू लागला आहे. मेहूणबारे परिसरात परवा झालेल्या अतिवृष्टीने उभी पिके पाण्यात गेली असून पिके सडण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबेखडकीसीम गावाचा रात्रभर संपर्क तुटला

मेहूणबारे मंडळात खडकीसीम, वरखेडे भागात रविवारी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. नोंदीनुसार तब्बल ६८ मिमी पाऊस झाला. खडकीसीम गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत पाणी आले होते. परिणामी या गावाचा इतर गावांशी रात्रभर संपर्क तुटला होता. सोमवारी (ता. ६) सकाळी पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. रविवारी रात्रभर देखील पाऊस सुरू असल्याने खडकीसीम धरणाकडे पाण्याचा विसर्ग जोरात होता. परिसरातील लहान मोठे पाणलोट भरल्याने पाणी गिरणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जात आहे. खडकीसीम आणि मेहूणबारे दरम्यान असलेल्या नाल्याला पाणी आल्याने खडकीसीम- मेहूणबारे गावाचा संपर्क रात्रभर तुटला होता. त्यामुळे काहींना खडकीसीम गावातच मुक्काम करावा लागला. वरखेड्यात घरांची पडझड झाली. दरम्यान सततच्या पावसामुळे वरखेडे गावात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होत असून या नुकसानीचे सोमवारी तलाठी यांच्याकडून पंचनामा करण्यात आला.

हेही वाचा: शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले..आणि मग सापडला खुनाचा संशयित

तितुर, डोंगरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितुर व डोंगरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यानूसार प्रशासनाने नागरिकांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

loading image
go to top