दुर्दैवी घटनाः कुलरचा शाॅक लागून चिमुकल्या भावंडाचा मृत्यू !

दुर्दैवी घटनाः कुलरचा शाॅक लागून चिमुकल्या भावंडाचा मृत्यू !
Updated on: 

चाळीसगाव: वडील कामावर व आई घरात स्वयंपाक करीत असताना अंगणात खेळणाऱ्या तीनवर्षीय दोघा चिमुरड्या भावंडांचा पत्र्याच्या कूलरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शहरातील मेहतर कॉलनीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

शहरातील मेहतर कॉलनीतील रहिवासी विकी गोयर व राकेश गोयर हे भाऊ शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये साफसफाईचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर ते गेले होते. त्यांची मुले राणू विकी गोयर (वय ३) व रोहन राकेश गोयर (३) हे दोघे घराबाहेर खेळत होते. त्यांच्या आई घरात स्वयंपाक करीत होत्या.

खेळता खेळता धक्का लागला

घराच्या बाहेर ठेवलेला पत्र्याचा कूलर सुरू असताना खेळता खेळता या दोघा बालकांचा या कूलरला धक्का लागला. ज्यामुळे दोन्ही बालके कूलरचा चिकटली. त्यांच्या ओरडण्याने शेजारी राहणारी घराबाहेर आली अन्‌ तिने तत्काळ कूलरचा वीजपुरवठा बंद केला. मात्र, दोन्ही चिमुरड्यांना विजेचा जबर धक्का लागल्याने राणू गोयर या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर रोहन गंभीर अवस्थेत असल्याने त्याला लगेचच हिरापूर रोडवरील बालकांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दोघा बालकांना विजेचा धक्का लागल्याने आजूबाजूच्यांनी तत्काळ धाव घेतली. मात्र, चिमुकल्यांचा जीव वाचविता आला नाही. आपल्या मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच दोघांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृत राणू व रोहन हे नात्याने चुलत भाऊ होते.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com