दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बिबट्या पुन्हा हल्ला!

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बिबट्या पुन्हा हल्ला!

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील शिवारात 8 ते 10 दिवसापासून शांत असलेल्या बिबट्याचा (Leopard) पुन्हा उपद्रव वाढला आहे. पिंपळवाड म्हाळसा - उंबरखेडे रस्त्यालगत एका शेतातील वासरूचा बिबट्याने फडशा (Attack) पाडल्याचा प्रकार आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( chalisgaon varkheda once again leopard attack farmer scared)

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बिबट्या पुन्हा हल्ला!
महामार्गावरील या ढाब्यांवर नक्की जा आणि जेवणाचा आनंद घ्या

उंबरखेड-पिंपळवाड म्हाळसा रस्त्यावरील अशोक पाटील शेतात गेले असता शेतातील वासरूचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती तात्काळ वन विभागाला दिली. वनविभागाचे वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक संजय चव्हाण श्रीराम राजपुत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

बिबट्याचे ग्रामस्थाला दर्शन

गेल्या 8-10 दिवसापासून बिबट्याच्या हालचाली थंडावल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी सुस्कारा सोडला होता.मात्र दोन दिवसापूर्वी पिंपळवाड म्हाळसा रस्त्यालगत वरखेडे खुर्द येथील प्रकाश सखाराम महाजन यांच्या शेताजवळ एका ग्रामस्थाला बिबट्याचे दर्शन झाले. भितीने थरकाप उडालेल्या या ग्रामस्थाने गावात धूम ठोकली.तर दोन दिवसापूर्वी पिंपळवाड येथील दोन पाळीव कुत्र्यांचाही फडशा बिबट्याने केल्याचे समोर आले आहे.

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बिबट्या पुन्हा हल्ला!
गॅज्युईटीची रक्कम जमा करण्यासाठी लाच घेणाऱ्या लिपीकाला अटक

एकच खळबळ

गेल्या काही दिवसापासून वरखेडे शिवारात बिबट्याने पशुधनावर हल्ल्याचे सत्र चालवले होते. त्यानंतर बिबट्याच्या कारवाया थंडावल्या होत्या. मात्र आठ दहा दिवसानंतर पुन्हा बिबट्या जागा झाल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com