esakal | नववधू सारखे लक्ष्मी आली घरा.. अनोख्या पद्धतीने केले तिचे स्वागत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

नववधू सारखे लक्ष्मी आली घरा.. अनोख्या पद्धतीने केले तिचे स्वागत ! 

मातृशक्तीचा आदर करत सर्वसामान्य भालेराव कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे.

नववधू सारखे लक्ष्मी आली घरा.. अनोख्या पद्धतीने केले तिचे स्वागत ! 

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा :स्त्री भ्रूण हत्त्येचे प्रमाण कमी व्हावे आणि मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे खरच कुठं तरी समाजाची मानसिकता बदलत आहे याचं जिवंत उदाहरण चोपडा तालुक्यातील अंबाडे या गावी पहायला मिळाले, मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत करत भालेराव कुटुंबाने मायलेकीस ज्या प्रमाणे नववधू घरात प्रवेश करतांना पूजन करून लक्ष्मी च्या पाऊलांसारखे पंचपदी करतात तशी पंचपदी करीत घरात प्रवेश केला.तसेच घरामध्ये प्रवेश करताना पायघड्या देखील टाकण्यात आल्या.

नक्की वाचा : मजूरीसाठी घरातून "त्या' निघाल्या...आणि उसाच्या शेतात मृत सापडल्या ! 
 

तालुक्यातील अंबाडे येथील रहिवासी लीलाधर राजाराम भालेराव यांचा मुलगा योगेश लिलाधर भालेराव व त्यांची पत्नी पल्लवी भालेराव यांना लग्नानंतर पहिलीच मुलगी झाली.पल्लवी यांनी मागील महिन्यात आपल्या माहेरी ताडे (ता एरंडोल) येथे कन्यारत्नास जन्म दिला. त्यानंतर महिन्यानंतर पल्लवी या आपल्या कुमारी हितांशी या कन्येसोबत सासरी अंबाडे येथे येणार होती.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण घर सजावट करून कन्या येणार म्हणून संपूर्ण घर आनंदात होते. त्याचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. एरवी स्री जन्म म्हणजे समाजाला कंटाळवाणा विषय झाला आहे. पोटी मुलगी आली म्हणजे समाजात तिची हेटाळणी होतांना आपण पाहतो. परंतु या भालेराव कुटुंबाने स्त्रि जन्माचे असे काही स्वागत केले ते खरंच वाखाणण्याजोगे आहे.

समाजासमोर नवीन वस्तू पाठ ठेवला आहे. ज्याप्रमाणे नव्या नवरीचे नवीन घरामध्ये स्वागत केले जाते, तसेच पंचपदी केली जाते त्याच पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत या भालेराव कुटुंबाने केले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कुमारी हितांशी योगेश भालेराव तिचे स्वागत पाच सुवासिनींनी केले तसेच घरात घेताना पुजा करुन, पंचपदी देखील केली. अशा पद्धतीने कन्या जन्माचे स्वागत या भालेराव कुटुंबाने केले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. असेच स्वागत प्रत्येक घरामध्ये स्रि जन्माचे होत राहिले तर स्रिभृण हत्या हा विषय संपायला वेळ लागणार नाही.

आर्वजून पहा : धुळे जिल्हा रूग्णालयातून दोनदा रुग्ण पसार...
 

मातृशक्तीचा आदर करत सर्वसामान्य भालेराव कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे. खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा झालेला सन्मान हा विकृत मानसिकतेला चपराकच म्हणावी लागेल.भालेराव कुटुंबीयांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. 
 

loading image