esakal | कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

sakal_logo
By
अल्हाद जोशीएरंडोल : सततची नापिकी,आई व वडिलांच्या उपचारावर झालेला खर्च यामुळे कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत (Economic crisis) असलेल्या 38 वर्षीय युवा शेतकऱ्याने (farmer) कर्जास (lone) कंटाळून गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नागदुली (ता.एरंडोल) येथे घडली.
( lon economic crisis young farmer suicide)

हेही वाचा: रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक

याबाबत माहिती अशी,की नागदुली येथील पिरण बुधा पाटील (वय 38) यांचेकडे तीन एकर शेती होती.पिरण पाटील यांचे आई वडील यांना कोरोना झाला होता.सुमारे एक महिन्यापूर्वी वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर आई कोरोनावर मात करून घरी आल्या होत्या.सततची नापिकी,आई वडिलांच्या उपचारावर झालेला खर्च यामुळे ते तणावाखाली होते.पिरण पाटील यांचेवर सोसायटीचे तसेच खाजगी कर्ज होते.सोसायटीचे कर्ज व खाजगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या तणावाखाली असलेल्या पिरण पाटील यांनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नागदुली येथे किराणा दुकानात गळफास घेवून आत्महत्या केली.

हेही वाचा: सर्वत्र बंद..आणि 'कोणी लिंबू घेता का लिंबू' म्हण्याची वेळ !

पिरण पाटील यांचे चुलत भाऊ भूषण हिलाल पाटील हे त्याच्या शेतात गेले असताना अमोल महाजन आणि सतीश माळी यांनी त्याना पिरण पाटील यांनी गळफास घेतल्याचे सांगितले.भूषण पाटील यांनी माहिती मिळताच घराकडे धाव घेतली.गावातील विलास पाटील,अजय पाटील,दीपक कोळी,प्रदीप महाजन यांनी पिरण पाटील यास खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मयात झाल्याचे सांगितले.याबाबत भूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करोत आहेत.मयात पिरण पाटील यांचे पच्छात आई,भाऊ,पत्नी,तीन मुली आणि घटस्फोटीत मनोरून बहिण असा परिवार आहे.

( lon economic crisis young farmer suicide)