esakal | सर्वत्र बंद..आणि 'कोणी लिंबू घेता का लिंबू' म्हण्याची वेळ !
sakal

बोलून बातमी शोधा

Lemon

सर्वत्र बंद..आणि 'कोणी लिंबू घेता का लिंबू' म्हण्याची वेळ !

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

त-हाडी : लिंबू (Lemon) उत्पादक शेतकऱ्यांपुढे (farmer) कोरोना काळात आर्थिक संकट (Economic crisis) उभे ठाकले आहे. एक तर भाव गडगडले, त्यात व्यापारी बागांकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीत. परिणामी झाडावरील लिंबू गळून मातीत मिसळत आहेत. कोरोना (corona) संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे त-हाडी ता.शिरपूर परिसरात चित्र पाहावयास मिळत आहे.

(lockdown effect low demand lemon production farmers crisis)

हेही वाचा: आमच्याकडे काही जादूची कांडी नाही ! डॉक्टरांचे भावनिक आवाहन

लाॅकडाऊन (Lockdown) मुळे बाजारपेठेत त्याला मागणीच नसल्याने अद्यापही शेतकऱ्यांकडून लिंबूची पाहिजे तशी तोड सुरू झाली नाही.बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मार्च महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल एप्रिल महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबू विक्रीचा विशेष करुन हंगाम असतो. व चांगला भावही मिळतो.पण सलग दुसऱ्याही वर्षी लॉकडाऊनमध्ये बाजार पेठेत मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

बाजारपेठेत मागणी घटली..

त-हाडीसह ता.शिरपूर परिसरात मोठ्या संख्येने लिंबाच्या बागा आहेत.उन्हाळ्याच्या हंगामात लिंबूला किलोला 80 ते 100 रुपये प्रति किलो भाव मिळतो. पण,कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे शासनाने लाॅकडाऊन घोषित केल्याने आठवडे बाजारसह रेस्टॉरंट, हॉटेल, लिंबू रसवंत्या बंद आहेत.त्यामुळे लिंबाची मागणी घटली. तसेच बाजारपेठेत ग्राहकही कमी झाले आहेत. आता फक्त मे महिना व एप्रिलचे काही दिवस माल विक्रीसाठी उरले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामातही लिंबाला मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

हेही वाचा: पाटाच्या पाण्यात दोन अल्पवयीन मुलांचा बुडुन मृत्यु !

लिंबाचा औषधांसाठी वापर

"सी" जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबाचा खाद्यपदार्थासह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवडीसह व्यवसायाकडे वळल्याचे दिसत आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने लाहीलाही होणाऱ्या शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबाचे सरबत जास्त प्रमाणात लोक घेत आहेत. कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी व रोग प्रतिकारशक्ती वाढ विण्यासाठी देखील काळा चहा पिण्यावर नागरिकांचा भर असून यामध्ये लिंबाचा वापर केला जातो. उसाचा रस काढताना देखील लिंबाचा वापर केला जातो. सध्या सर्वत्र बंदची अवस्था असल्याने लिंबाची मागणी घटली असून लिंबाच्या घटत्या किमतीने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

सद्यस्थितीत लिंबाच्या एका गोणीला 70-80 रुपये असा दर मिळतो. हे लिंबं तोडण्यासाठी 40-50 रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर वाहतूक व बाजारपेठेतील इतर खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या हाती काहीही येत नाही.

सुवर्णाबाई दिपक कदम -लिंबू उत्पादक,त-हाडी

हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

चौकट-मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबाला चांगली मागणी असते व भावही मिळतो. पण, लॉकडाऊनमध्ये बाजारपेठे बंदमुळे मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही खरी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

- नरेंद्र शेनपडु पाटील, लिंबू उत्पादक, भटाणे

(lockdown effect low demand lemon production farmers crisis)