जळगावात ‘एसीबी’ची कारवाई;  एक हजारांची लाच घेताना तलाठीला रंगेहाथ पकडले 

जळगावात ‘एसीबी’ची कारवाई;  एक हजारांची लाच घेताना तलाठीला रंगेहाथ पकडले 

जळगाव ः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत एकीकडे कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी रात्रींचा दिवस करून विविध उपाय करीत आहे, दुसरीकडे मात्र त्यांच्या विभागातील काही मंडळी लाच घेवून कामे करण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांताधिकारी दीपमाला चौरे, लिपीक अतूल सानप यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. आता मेहरूण कार्यालयाचा तलाठी सचिन माळी यास एक हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे ‘कलेक्टोरेट’मध्ये चाललय काय ?असा प्रश्‍न सर्वसामान्यांपेक्षा उपस्थित होते आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले, की एका वेंडरने याबाबत तक्रार दिली की त्यांच्या अशीलाचे दुकान नावावर करण्याच्या बदल्यात मेहरूणचे तलाठी सचिन माळी (वय ३७, रा.आनंदप्लाझा अपार्टमेंट, आनंद नगर, महाबळ,जळगाव) यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानूसार लाचलूचपत प्रतिबंधक विभगाने आज सापळा रचून माळी यांना तलाठी कार्यालयात एक हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. 

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, सहाय्यक फाैजदार रविंद्र माळी, हवालदार अशोक अहीरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, वंदना अंबीकार, शैला धनगर, सुनिल शिरसाठ, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com