देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दांम्पत्याचा अपघात; रिक्षाने दिली धडक

रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फुटून रिक्षाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट समोरून येणाऱ्या दुचाकीवर जावून आदळली.
Accident
Accident
Updated on

यावल: येथे फैजपूर रोडवर महाविद्यालयाजवळ रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फूटून झालेल्या अपघातात (Accident) तीन जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी सुमारास महाविद्यालयाजवळ घडला.

Accident
शिवसेनेच्या हिंदूत्वावर बोलण्याचा मनसेला अधिकार नाही-मंत्री पाटील

मुक्ताईनगर येथील दाम्पत्य निवृत्ती पुंडलिक पाटील ( वय ४२) व त्यांच्या पत्नी शारदा निवृत्ती पाटील हे दुचाकीद्वारे श्री क्षेत्र मनुदेवी (Shri Kshetra Manudevi) येथे जात असतांना समोरून फैजपूरकडे महेंद्र कोळी ( वय ३२,रा. अट्रावल) हे रिक्षा घेऊन जात असलेल्या रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फुटून रिक्षाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट समोरून येणाऱ्या दुचाकीवर जावून आदळली. यावेळी अपघात होऊन जखमी तिघांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षाचालक महेंद्र कोळी याचे डोक्याला जबर मार लागला आहे. तर निवृत्ती पुंडलिक पाटील यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर होऊन त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

Accident
आई-वडीलांची भेट ठरली अखेरची भेट..अभियंत्याचा अपघातात मृत्यू

त्यांच्या पत्नी शारदा पाटीलयांना किरकोळ दुखापत झाली. जखमींवर डॉक्टर शुभम तिडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, आशा आदीवाल, भूषण गाजरे यांनी प्रथमोपचार करून निवृत्ती पाटील यांना तातडीने फैजपूर येथील खासगी रुग्णालयात तर महेंद्र कोळी यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com