esakal | महापूरामुळे शेतकऱ्यांचा तोडी आलेला घास हिरावला..
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers Damage

महापूरामुळे शेतकऱ्यांचा तोडी आलेला घास हिरावला..

sakal_logo
By
प्रमोद पवार


कजगाव ता भडगाव: येथील तितूर नदीला आलेला महापूरामुळे (Flood) दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा तोडी आलेला घास हीरावला आहे.परिसरातील सुमारे सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांच्या (Farmers Damage) शेतात पाणी शिरल्याने संपूर्ण पीक आडवे झाले आहे यामुळे हाती आलेला घास पुराच्या पाण्यामुळे रावला असून लाखो रुपये खर्च केलेला वाया गेला आहे एक रुपयाचे देखील उत्पन्न हाती येणार नसल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाले आहेत आता पुढील हंगामाकरीता पैसा नाहीतर शेती कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी शासनाने या शेतकर्यासाठी अधिकची मदत करावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: कोकणच्या धर्तीवर जळगावच्या अतीवृष्टी बाधितांना मदत करा-खासदार पाटील

दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान: येथील तितूर नदीला आलेल्या महापूरामुळे नदीपात्रा भागातील जमिन क्षेञ अधिक बाधीत झाले येथील शेतकरी योगेश पाटील यांची दोन एकर शेतीत कापूस लागवड केली होती मात्र पाण्याच्या प्रवाहात संपूर्ण शेत वाहुन गेले आहे तसेच अर्जुन चौधरी यांच्या देखील शेतात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह झाला त्यामुळे शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता शेतातील विहीरसह कापूस पीक वाहून गेले आहे.


के टी बांधरा मुळे शेतात पाणी

शेतकऱ्यांचा आरोप केले असून तितूर नदीला महापूर आला असला तरी या ठिकाणी असलेल्या के टी बांधऱ्यात गेल्या वर्षी पाणी साठा व्हावा म्हणून बांधऱ्यात टाकलेल्या पाट्या लघुपाटबंधारे विभागाचे काढल्या नाहीत त्यामुळे अचानक आलेल्या पुराचे पाणी वाहून न जाता आजुबाजूच्या शेतात पाणी शिरले मुळे हे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तरी या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी ‘एमपीएससी’ परिक्षा देणार

आमदार किशोर पाटील यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी
येथील तितूर नदीला आलेला महापूराचे पाणी शेतात शिरल्याने बहूतांश पिके वाहुन गेली आहेत या गंभीर परिस्थिती ची पाहणी करण्यासाठी आमदार कीशोर पाटील आज दि1 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कजगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी हताश झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत संवाद साधला तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच महसूल आणि कृषी विभागातील अधिकार्यांना तत्काळ पंचनामा करून अहवाल तयार करण्याच्या सुचना केली यावेळी पंचायत समिती सभापती डॉ विशाल पाटील, सुभाष पाटील, कजगावचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील , उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार मुकेश हीवाळे, कृषी अधिकारी बी बी गोराडे, अनिल महाजन, भूषण पाटील यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: ब्रेकिंगः जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

लघुपाटबंधारे विभागाचे गलथान कारभार
नुकसान साठी कारणीभूत प्रकरणी चौकशी करणार आमदार किशोर पाटील
कजगाव येथे पुरामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेकांची शेती पाण्याखाली आली होती यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या समोर केला यावेळी शेतकरी संतप्त झाले होते दरम्यान आमदार किशोर पाटील या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले

loading image
go to top