जळगावच्या उपमहापौरपदी भाजपचे सुनील खडके बीनविरोध 

भूषण श्रीखंडे
Wednesday, 11 November 2020

भाजपतर्फे चार अर्ज घेण्यात आले होते. यात सुनील खडकेंसह भगत बालाणी आदी दोन नावांची चर्चा होती. उपमहापौरपदाचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी होती.

जळगाव  ः उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे एकमेव अर्ज सुनील खडके यांचा आला होता. उपमहापौर निवडीची आज झालेल्या विशेष महासभेत पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांनी सुनील खडकेंची बीनविरोध निवड केली. यावेळी त्यांच्या पुश्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. तसेच विरोधीपक्ष शिवसेनेच्या सदस्यांनी देखील खडकेंचा अभिनंदन केले.  

आवश्य वाचा- कोरोना’लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरला !

उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. आश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिला होता. महापौरपद निवड समितीची आज विशेष आॅनलाईन महासभा सकाळी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतिश कुलकर्णी उपस्थित होते. 

 

भाजपतर्फे चार अर्ज घेण्यात आले होते. यात सुनील खडकेंसह भगत बालाणी आदी दोन नावांची चर्चा होती. उपमहापौरपदाचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी होती. त्यानुसार भाजपची महापौरांच्या दालनात मंगळवारी बैठक होवून सुनील खडके यांचे नाव निश्चीत करून अर्ज खडकेंनी भरला होता. 

 

उपमहापौरदी खडकें बीनविरोध 

उपमहापौरपदासाठी सुनील खडकेंचा एकमेव अर्ज असल्याने बीनविरोध निवड निश्चीत होते. आज झालेल्या निवडीच्या सभेत पिठासीन अधिकारी तथा  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपमहापौर पदी खडकेंची बीनवीरोध निवड झाल्याची जाहीर केले. 

आवर्जून वाचा- पालकांच्या लेखी संमतीनंतरच विद्यार्थ्यांची शाळेत होणार ‘एन्ट्री’! 
 

आमदार भोळेंनी केले अभिनंदन  

उपमहापौर पदाच्या निवडी प्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह शहरातील भाजपचे पदाधिकारी व महापालिकेतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर सुनील खडकेंचा अभिंनद यावेळी आमदार भोळे यांच्यासह पदाधिकाऱयांनी यावेळी केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP's Sunil Khadke unopposed as Deputy Mayor of Jalgaon