उपमहापौर पदासाठी भाजपचे सुनिल खडकेंचा एकमेव अर्ज ; बीनवीरोध निवड निश्चीत !

भूषण श्रीखंडे
Tuesday, 10 November 2020

उपमहापौर पदासाठी अनेक खलबते झाले असून लेवा पाटील समाजाच्या गटाने भाजपचे गिरीश महाजन यांची भेट घेवून नाराजी व दबावतंत्र अवलंबले होता.  त्यानंतर उपमहापौर पदाचा डॉ. सोनवणेंनी राजिनामा दिला होता

जळगाव ः  उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी रस्सीखेच भाजपमध्ये सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी सकाळी महापौरांच्या दालनात भाजपची बैठक होवून यात सुनील खडके यांचे नाव निश्चीत करण्यात आले. तर सुनील खडकेंनी भाजपातर्फे नामनिर्देशन पत्र (अर्ज) भरला आहे.

आवश्य वाचा- ‘कोरोना’पासून कोसो दूर असेही एक गाव ! 

उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. आश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर महापौर पदासाठी भाजतर्फे चार अर्ज घेण्यात आले होते. यात सुनील खडकेसह, भगत बालाणी आदी दोन नावांची चर्चा होती. उपमहापौर पदासाठी आज अर्जदाखल करण्याची शेवटचा दिवस असल्याने आज भाजपाची महापौर भारती सोनवणे यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी महापौर भारती सोनवणे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे, पार्वताबाई भिल, रेश्मा काळे, कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, एडवोकेट पोकळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, डॉ. राधेश्याम चौधरी, मनोज अहुजा, महेश जोशी, नितीन इंगळे, भरत सपकाळे, पिंटू काळे, अतुल हाडा, गोकुळ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

अन् नाव झाले निश्चीत

भाजतर्फे सुनील खडके यांचे नाव बैठकीत निश्चीत करून  चार नामनिर्देशन पत्र घेण्यात आली त्यापैकी दोन नामनिर्देशनपत्रे ही सुनील वामनराव खडके यांची आज अर्ज नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे सुपूर्द केली.

वाचा- खडसेंच्या पक्षांतरानंतर महाजनांचे शक्तिप्रदर्शन ! 
 

बीनवीरोध निवड

उपमहापौर पदासाठी अनेक खलबते झाले असून लेवा पाटील समाजाच्या गटाने भाजपचे गिरीश महाजन यांची भेट घेवून नाराजी व दबावतंत्र अवलंबले होता.  त्यानंतर उपमहापौर पदाचा डॉ. सोनवणेंनी राजिनामा दिला होता. त्यानंतर उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचे नाव आज निश्चीत करून अर्ज भरला आहे. खडकेंचा एकमेव अर्ज आलेला असल्याने उद्या पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया सभेत सुनील खडकेंची बीनवीरोध निवड औपचारीक घोषणा ही केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP's sunil khadke's unopposed election for the post of deputy mayor is certain