बीजेएस संघटना प्लाज्मा डोनर्सची यादी तयार करणार 

भूषण श्रीखंडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळू शकते व त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. 

जळगाव ः कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या चार महिन्यात भारतीय जैन संघटनेला (बीजेएस) कोरोना संदर्भात महाराष्ट्रातील गावागावात वेगवेगळे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. या सर्व अनुभवावरून असे दिसते कि कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. वास्तविक पाहता कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळू शकते व त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. 

सध्या केंद्र व वेगवेगळ्या राज्य शासनातर्फे कोरोनाच्या संदर्भात प्लाज्मा थेरपीवरती गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरु आहे. या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागू शकतो.  या कालावधीत प्लाज्मा डोनर्सला शोधण्याचे व त्यांची संमती घेण्याचे काम सुरु केले तर कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकते. 

या अनुषंगाने बीजेएसने संपूर्ण महाराष्ट्रात “बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजने” च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या ५००० व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय बीजेएसने घेतला आहे. यासाठी किमान १७ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती, कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे आणि इतर कोणतेही गंभीर आजार नसलेल्या व्यक्तीच प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. 

बीजेएसच्या वतीने सर्व कोरोना योद्ध्यांना आवाहन करण्यात येते की आपण आपला प्लाज्मा दान करून एक पुण्याचे काम करावे. असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे जळगाव जिल्हा प्रमुख विनय पारख (जळगाव) 9822009371,  विनोद जैन (अमळनेर) 9423902982, लतीश जैन (चोपडा) 9850246861, सुभाष राका (भडगाव) 9422780511, संजय सुराणा (भुसावळ) 9823016723, कांतीलाल श्रीश्रीमाळ (पाचोरा
) 9422774570, प्रितेश साकरीया (वरणगाव) 8055030550, रमण जैन (मुक्ताईनगर) 9422573735, सुमित मुनोत (जामनेर) 9579235135 प्रशांत बेदमुथा (पहुर) 9423940457, संदीप बेदमुथा (चाळीसगाव) 8669153218, डॉ. नीलेश जैन (पारोळा )9423580235. यांनी केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The BJS organization will compile a list of plasma donors