
रक्तदात्यांच्या कर्तृत्वाने कोरोना संकटावरही मात !
जळगाव : संपूर्ण जगात कोरोना (corona) महामारीने थैमान घातले असून, भारतातदेखील (India) कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरूपाची (second wave corona) होती. त्यात कोरोनावर लस निघाल्यावर लसीकरण (Vaccination) सुरू झाले. मात्र, लसीकरण केल्यावर रक्तदान एक महिना करता येत नसल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा (Blood shortage) भासेल, अशी स्थिती निर्माण झाली. परंतु रक्तदात्यांच्या कर्तृत्वाने जळगाव जिल्ह्यात फारसा रक्ताचा तुटवडा जावणवला नाही. राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिर (Blood donation camp) घेऊन रक्ताचा तुटवडा भासू दिला नाही. (blood donors donated large corona crisis was no shortage blood)
कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात अनेक ठिकाणी रक्तासह प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. त्यामुळे रक्ताचा तुटवडा अनेक शहरात जाणवत होता. त्या वेळी कोरोनामुळे रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्त कुणी पुढे येत नसल्याचे दिसून येत होते. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना रक्त व प्लाझ्माचा तुटवडा जाणवणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर बंधने आली होती. त्यानुसार राज्य शासनानेदेखील रक्तदान शिबिर घेण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. परंतु रक्तदात्यांनी कर्तृत्व ओळखत कर्तव्य पार पाडले. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासला नाही.

World Blood Donor Day
रेडक्रॉसची कामगिरी अतुलनीय
राज्यात शासकीय, खासगी अशा सुमारे साडेतीनशे रक्तपेढ्या आहेत. प्रत्येक रक्तपेढ्यांची रक्त साठविण्याची क्षमता त्यांच्या यंत्रणेनुसार वेगळी आहे. त्यात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या २५ रक्तपेढा आहेत. त्यात जळगाव शाखेची जवळपास पाच हजार रक्तपिशवी संकलन करण्याची क्षमता आहे. त्यात १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत सुमारे साडेअकरा हजार रक्तपिशव्यांचे संकलन, तर सुमारे पंधरा हजार रक्तपिशव्या गरजू रुग्णांना देण्यात आल्या.
आता १४ दिवसांनंतर रक्तदान
कोरोनाची लस घेतल्यानंतर आता १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकणार असल्याची मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे रक्तदान करणे अधिक सुलभ होणार आहे.

blood donor
जळगावात ३७५ प्लाझ्मा दान
जळगाव शहरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरीसाठी प्लाझ्मा लागत होता. त्यानुसार ३७५ प्लाझ्मा रुग्णांना देण्यात आले.
कोरोनाच्या संकटात त्यात दुसऱ्या लाटेत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता होती. परंतु जळगाव जिल्ह्यातील लोक संवेदनशील असून, त्यांनी रक्तदानासाठी घेतलेला पुढाकार, तसेच जिल्हा प्रशासनाकडूनदेखील वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याने रक्ताअभावी कोणाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला, असे घडले नाही.
-डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव