जळगावात भारत बंदचा फज्जा; काँग्रेस,राष्ट्रवादीकडून मार्केट बंद

केंद्रा शासनाविरोधात आज भारत बंद आहे. हे आंदोलन काँग्रेस श्रेष्ठी सोनीया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानूसार होत आहे.
Jalgaon City Movment
Jalgaon City Movment
Updated on



जळगाव : शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात तसेच केंद्र शासनाकडून (Central government) केल्या जाणाऱ्या खासगीकरणाविरोधात जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (Nationalist Congress) आज भारत बंदचे आवाहन केले होते. सकाळी दुकाने उघडली मात्र आंदोलकांनी सुरू असलेली दुकाने बंद करण्यास लावली. यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठा सकाळी बंद झाल्या. मात्र काही वेळातच बाजारपेठा (Market)पून्हा सुरू झाल्याने बंदचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिक़ाणच्या व्यापारी संकूलात जावून दूकाने बंद करायला लावत होते.

Jalgaon City Movment
Alert: जळगाव जिल्ह्यात उद्या अतिवृष्टीचा इशारा


माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा मंगला पाटील, युवती अध्यक्षा कल्पीता पाटील, राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील, विनोद देशमुख, शहराध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादीचे विलास पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. जी. पाटील यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत शहरातील बाजारपेठा बंद करीत व्यापाऱ्यांना आंदेालनात सहभागी हेाण्याची आवाहन केले.



देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: ढासळली असून, शेतकरी अकरा महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. मात्र, या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही. शासनाकडून रेल्वे, बँक, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग दूरसंचार व बंदरांचेही खासगीकरण केले जात आहे. देशात मात्र इंधनासह गॅसच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत त्यामुळे भारत बंदची हाक आज देण्यात आली होती.

Jalgaon City Movment
Jalgaon : ठराविक वेळेतच भाविकांना दर्शनाचा लाभ



केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन कायदे पास केले. त्यासाठी पार्लमेंटमध्ये चर्चा केली नाही. शेतकऱ्यांबरोबरही चर्चा केली नाही. हे कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनात अनेक शेतकरी ठार झाले आहेत. यामुळे केंद्रा शासनाविरोधात आज भारत बंद आहे. हे आंदोलन काँग्रेस श्रेष्ठी सोनीया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानूसार
होत आहे.

- डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार (काँग्रेस)


केंद्र शासनाच्या विरोधात आज राष्ट्रवादी व कॉँग्रेसतर्फ भारत बंद पाळण्यात आला आहे. सर्व दुकाने आम्ही बंद करून व्यापाऱ्यांना त्यात सहभागी करून घेत आहे. केंद्राने शेतकऱ्यां विरोधात कायदे केल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे, शेतकऱ्यांची लुट होत आहे.
यामुळे जळगावमध्येही आंदोलन मोठ्या प्रमाणात करीत आहे.

- गुलाबराव देवकर, माजीमंत्री (राष्ट्रवागी काँग्रेस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com