Alert: जळगाव जिल्ह्यात उद्या अतिवृष्टीचा इशारा

Jalgaon Alert News: हवामान विभागाकडून १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा व तालुका निहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून पर्जन्यमान निश्चित करण्यात आले आहे.
Heavy Rain
Heavy Rain



जळगाव : जून ते सप्टेंबरअखेरच्या सरासरीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी ६३२.६ पर्जन्यमान आहे. आतापर्यंत ६२०.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानुसार १०४.१ टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान, समुद्रात (Sea)तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या मंगळवारी (ता. २८) हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे.

Heavy Rain
तर ७० हजार शिक्षकांची भरती झाली असती-मंत्री गुलाबराव पाटील


आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस चाळीसगावला ८६३.२ मिलिमीटर (१४७.२ टक्के) तर सर्वांत कमी चोपडा तालुक्यात ४४८.३ मिलिमीटर (७१.७ टक्के) झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ५० वर्षांनंतर प्रथमच गेल्या वर्षी २०२० मध्ये जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६०, तर ऑक्टोबरअखेर ६७५.८० सह जानेवारी ते डिसेंबरचे ७१९.७० मिलिमीटर निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ६६३.३३ मिलिमीटरनुसार गणना होती. २०१९ अखेर सरासरी १२० टक्के पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर हवामान विभागाकडून १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा व तालुका निहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून पर्जन्यमान निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वच १५ तालुकांस्तरासह मंडळ स्तरावर कृषी विभाग कार्यालयात पर्जन्यमान नोंदीनुसार चाळीसगाव ८६३.२, तर चोपडा तालुक्यात ४४८.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे.

Heavy Rain
धुळे मनपाचा अडकलेला ‘बजेट’ पुढे सरकणार कधी?


तालुक्यांतील सरासरी पर्जन्यमान :

तालुका--सरासरी पर्यन्यमान-- आतापर्यंतचा पाऊस--टक्के

जळगाव-- ६७३.९-- ५९४.४-- ९३
भुसावळ-- ६०१.२-- ५२२.७--९१.८
यावल-६४२.७ -- ५६०.१-- ९२.१
रावेर--६४६.३-- ६३७.६-- १०५.२
मुक्ताईनगर--५७०.९-- ५३५.५-- ९९.९
अमळनेर--५८८.९-- ५६०.१---१०१
चोपडा--६५९.४-- ४४८.३--७१.७
एरंडोल--६०३.६-- ६३४.९---११०.८
पारोळा--६१९.८-- ७३२.२--१२५.६
चाळीसगाव--६३७.६--८६३.२--१४७.१
जामनेर--६८८.७--७१५.४----११०
पाचोरा--६४५.३--६६२.२--१०९.६
भडगाव--६४६.३-- ६०५.२-- १००.२
धरणगाव--६७८.५-- ५६१.८-- ८८.६
बोदवड-- ६७२.३-- ५७६.६---९२.२
एकूण-- ६३२.६-- ६२०.२--१०४.१ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com