esakal | सायबर क्राईम:ऑनलाईन साडीचा परतावा वृध्दाला पडला महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber ​​Crime

सायबर क्राईम:ऑनलाईन साडीचा परतावा वृध्दाला पडला महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः ऑनलाईन मागविलेली साडी खराब निघाल्याने ती, परत करण्याच्या नादात जळगाव शहरतील गणेश कॉलनीतील सेवानिवृत्त वृध्दाची ७४ हजार ९९९ रुपयात फसवणूक झाल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (Cyber ​​Crime)दाखल झाला आहे.

हेही वाचा: फेरफटका मारणाऱ्यांच्या समोर आला..आणि पसरली भीती

गणेश कॉलनी येथे अनंत नारायण कुलकर्णी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. कुलकर्णी यांनी ३१ ऑगस्ट रोजी आयबीआयएसबी यां कंपनीतून ऑनलाईन पद्धतीने साडी मागविली होती. साडी मिळाली मात्र, ती खराब निघाल्याने कुणकर्णी यांनी गुगलवरुन कंपनीचा ८९६९९२३२७० हा क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क साधला असता, संबधितांनी एनी डेक्स ऍप डाऊनलोड करायला सांगितले.

हेही वाचा: कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..

ऍप डाऊनलोड करताच..

यादरम्यान कुलकर्णी यांना त्यांचा मोबाईल नंबरही दिला. ऍप डाऊनलोड करताच कुलकर्णी यांच्या बॅकखात्यातून पहिल्या वेळी २५ हजार दुसर्‍या वेळी ४९ हजार ९९९ असे एकूण ७४ हजार ९९९ रुपये कपात झाल्याचे कुलकर्णी यांना मेसेज आले. ८९६९९२३२७० या क्रमांकावरील व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर कुळकर्णी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुषार जावरे करीत आहेत.

loading image
go to top