esakal | फेरफटका मारणाऱ्यांच्या समोर आला..आणि पसरली भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards

फेरफटका मारणाऱ्यांच्या समोर आला..आणि पसरली भीती

sakal_logo
By
फुंदिलाल माळी


तळोदा ः शहरातील शहादा रस्त्यावर वनविभागाच्या झाडाझुडुपांमधून निघून रस्ता पार करत बिबट्याने राजेंद्र गुरव यांच्या सर्विस सेंटर जवळून उत्तरेकडील नाल्यात प्रवेश केल्याने सायंकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांचा रस्ता जणू बिबट्याने (Leopards) अडवला होता. शुक्रवारी सायंकाळी पावणे आठला अचानक घडलेल्या या घटनेने शहादा रस्त्यावर भितीचे वातावरण पसरले होते. त्यात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासोबत वनविभाग कार्यालय (Forest Department Office) जवळील पुलावर पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा: कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..


शहरातील शहादा रस्त्यावर मेवासी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे या परिसरात बरीच झाडे झुडपे आहेत तर सातपुड्यात उगम पाहणारा एक नाला देखील याच परिसरात आहे. या सर्व संधीचा फायदा घेत या परिसरात नेहमी बिबट्या दिसत असल्याचे शहरात चर्चिले जात असे. त्यात व्यायामासाठी फेरफटका मारणाऱ्या नागरीकांना अनेक वेळा हिस्त्र प्राण्यांचे दर्शन या परिसरात झाले आहे.

हेही वाचा: तर..रोहिणी खडसेंच्या नावावर सहमती!


शहादा रस्त्यावरील प्रवेशद्वारापर्यंत व्यायामासाठी फिरत असताना अचानक सामाजिक वन विभागाकडील झाडाझुडपांमधून बिबट्या रस्त्यावर आला व राजेंद्र गुरव यांच्या सर्विस सेंटर जवळून उत्तरेकडे गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. यात अनेक सायकलस्वार, मोटारसायकलस्वार, ओपन जिम वर व्यायाम करणारे नागरिक एकमेकांना आरडाओरड करून सावध करत होते. त्यामुळे अनेकांनी या बिबट्याचे दर्शन घेतल्याचे शहादा रस्ता परिसरातील रहिवासी मुख्याध्यापक भरत पटेल व राजेंद्र गुरव यांनी सांगितले. त्यात या परिसरात बिबट्याचे वास्तव्य नेहमीच असल्याने किमान वन विभाग आता तरी या शहरालगत फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करेल काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची काळजी घेत वनविभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा: धुळ्यात थकीत ६६ कोटींचा ‘डोंगर’;मनपाकडून जप्तीच्या नोटिसा


वनविभागाच्या कार्यालयाजवळील पुलावर रात्री अंधार असतो. तेथे पथदिव्यासाठी पोल टाकण्यात आले आहेत. मात्र त्यावर दिवे अजून बसवलेले नाहीत. त्यामुळे तेवढ्या भागात अंधार राहत असल्याने त्या परिसरात पुरेश्या उजेडासाठी पथदिवे बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

loading image
go to top