
महामार्गाच्या कामाची गती वाढावी, काम लवकर पूर्ण होण्यासाठी काल जिल्हाधिकारी राउत यांनी महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदारांची बैठक घेतली होती.
चक्क ‘कलेक्टर’च उतरले महामार्गाच्या पाहणीसाठी !
जळगाव ः शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम संथगतीने सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी राऊत आज कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष महामार्गावर उतरले होते. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे विज कंपनीने पोल, डी.पी., महापालिकेचे अतिक्रमण, जलवाहिनी, नाल्यातील पाणी वाहून जाण्याासाठी नसणारे मार्ग आदी अडचणीची पाहणी जिल्हाधिकारी राऊत यांनी केली.
आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात ५३ हजार रुग्ण कोरोनातून झाले मुक्त ! -
सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी राऊत, आर.टी.ओ.शाम लोही, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक सी.एम.सिन्हा संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
महामार्गाच्या कामाची गती वाढावी, काम लवकर पूर्ण होण्यासाठी काल जिल्हाधिकारी राउत यांनी महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदारांची बैठक घेतली होती. त्यात कंत्राटदारांनी काम करताना येणाऱ्या अडचणीचा पाढाच वाचला. त्यावर जिल्हाधिकारी राउत यांनी प्रत्यक्ष कामाची व अडचणीची पाहणी करू असे सांगीतले. त्यानूसार आज सकाळी अकरापासून जिल्हाधिकारी राउत यांनी अधिकाऱ्यांना घेवून शहरातील सर्व महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची माहिती जाणून घेतली. आकाशवाणी चौक ते मुसळीफाटा (ता.धरणगाव) पर्यंत महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यात आली.
वाचा- जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी
त्यात अनेक ठिकाणी विजेचे पोल, डी.पी. आहे. त्या विज कंपनीला सांगूनही स्थलांतर करण्यात आलेले नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. जी काढण्यासाठी महापालिकडे वारंवार पाठपूरावा केला गेला. मात्र ती महापालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन विभागाने काढली नाहीत. अनेक ठिकाणी जलवाहिन्या आहेत त्यांचेही स्थलांतर करण्यात आले नाही. छोट्या नाले यांच्यातील पाणी पुढे वाहून जाण्यासाठी मार्ग नाही आदीं अडचणी कंत्राटदारांनी, महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या. त्या अडचणींची नोंद घेत लवकरच विज कंपनीचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, अभियंते, अतिक्रमण निमुर्लन विभागाचे अधिकारी महामार्गा प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेवून महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सांगितल्या जाणार आहेत.
मार्चअखेरपर्यंत शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करावेच याच हेतून कामात येणाऱ्या अडचणींची पाहणी आज केली. विज कंपनी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून अडचणी दुर करण्याबाबत आदेश दिले जातील. चौपदरीकरण लवकर पूर्ण होण्यासाठी आजचा महामार्ग काम पाहणी दौरा होता.
- जिल्हाधिकारी अभिजीत राउत.
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Marathi News Jalgaon Collector Inspected Slow Moving Highway Works
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..