"कोरोना' रुग्ण जेथे आढळत आहे, तेथे वर्गवारी करून तपासणी मोहीम राबवा- मंत्री गुलाबराव पाटील 

"कोरोना' रुग्ण जेथे आढळत आहे, तेथे वर्गवारी करून तपासणी मोहीम राबवा- मंत्री गुलाबराव पाटील 
Updated on: 

जळगाव : "कोरोना' पॉझिटिव्ह आढळलेल्या भागांना त्याच्या तीव्रतेनुसार ए, बी आणि सी या तीन वर्गवारीत विभाजित करून जेथे रुग्ण जास्त तिथे आधी या प्राधान्यक्रमाने तपासणी करावी, असे निर्देश आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. त्यांनी महापालिका क्षेत्रात कोविड-विषाणूच्या प्रतिकारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. 

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा विश्रामगृहात आढावा बैठक झाली. यात आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी "कोरोना'चा संसर्ग राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांबाबत माहिती दिली. यात त्यांनी शहरातील रूग्णांना छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती दिली. 

या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे, अधिष्ठाता डॉ. बी. एन. खैरे, डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, डॉ रावलाणी ,माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक अमर जैन, नितीन बरडे यांची उपस्थिती होती. 
 

निधीची कमतरता नाही 
पालकमंत्री पाटील म्हणाले, की जळगावात नागरिकांची तपासणी करताना ती सुनियोजित पद्धतीत करणे गरजेचे आहे. यात जास्त रुग्ण असणारा भाग, मध्यम रुग्णसंख्येचा आणि कमी रुग्णसंख्येचा भाग यांना अनुक्रमे ए, बी आणि सी या वर्गवारीत विभाजित करावे आणि याच क्रमानुसार नागरिकांची तपासणी करावी. "कोरोना' बाधित रुग्णांना कोविड रुग्णालयात एखाद्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे सुविधा मिळावी, यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

"कोविड' रुग्णांसाठी स्मशानभूमी 
कोविड रुग्णालयात नियमितपणे सॅनिटायझेशन, ऑक्‍सिजनचा साठा पुरेसा ठेवा, अशा सूचना दिल्या. येथील पॉझिटिव्ह रुग्णांची दर दोन तासांनी तपासणी करावी, आयसीयू कक्ष व क्वॉरंटाइन कक्षाची नियमित स्वच्छता व्हावी, सकस आहार, बाधित रुग्ण व त्यांच्या आप्तांचे मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. "कोरोना'बाधित मृतांच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याचे आढळून आल्याने शहरात कोविडच्या रुग्णांसाठी एक स्मशानभूमी राखून ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

तांबापुरात "थर्मल स्क्रीनिंग' 
तांबापुरा भागात प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रीनिंग करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तर शाहू महाराज रुग्णालयात डॉक्‍टर्सची कमतरता असल्याने ग्रामीण रुग्णालयांमधून दोन डॉक्‍टर्सला तातडीने येथे रूजू होण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. दरम्यान, शहरातील वाघनगर परिसरातील पाण्याची टंचाई लक्षात घेता येथे दोन टॅंकर्सची तरतूद करण्याचेही त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. 

डॉ. डांगे यांची चौकशी 
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉ. डांगे हे वारंवार "डीन'च्या खुर्चीत बसत असून, यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर गुलाबराव पाटील यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Marathi News Esakal
www.esakal.com