esakal | कोरोनामूळे रेशन धान्य दुकानांच्या तपासणीला ब्रेक !

बोलून बातमी शोधा

कोरोनामूळे रेशन धान्य दुकानांच्या तपासणीला ब्रेक !

कोरोनामूळे रेशन धान्य दुकानांच्या तपासणीला ब्रेक !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पहाता गेल्या दोन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांच्या (रेशन दुकाने)तपासणीचे तालुकानिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया रखडली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून अधिकारी कर्मचारी कोरोना प्रादूर्भाव उपाययोजनांतर्गत अन्य ठिकाणी पदभार दिल्यामुळे जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांची तपासणी प्रभावीत झालेली आहे.

हेही वाचा: सासऱ्याच्या मृत्यूनंतर जावयाचाही हृदयविकाराने मृत्यू

सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील वैयक्तिक, विविध पातळ्यांवर असलेल्या १ हजार, ९३८ रास्तभाव दुकानांची नियमितरित्या दरमहा तालुकास्तरावरील पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी व तहसीलदारांमार्फत तपासणी करण्यात येते. त्यामध्ये रास्तभाव दुकानांमधील धान्याचा पुरवठा, उचल केलेल्या धान्यातून वाटप केलेले धान्य, शिल्लक धान्य साठा, स्टाॅक रजिस्टर इत्यादी प्रकारची तपासणी करुन नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाउन नोंदी केल्या जातात. परंतु गत फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश रास्तभाव दुकानांच्या दरमहा तपासणीच्या कामाला ‘खंड' पडला आहे.

हेही वाचा: केळी नुकसानबाबत विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चाचपणी !

जिल्ह्यात वैयक्तिक स्तरावर १३५२, माजी सैनिक ४, महिला बचत गटांचे १२६, पुरुष बचत गटांचे २, ग्रा.पं.अंतर्गत १, अनुसूचित जातींतर्गत १२३, अनुसूचीत जमाती अंतर्गत ५५, सहकारी संस्थांतर्गत २८८ सह इतर ७ असे १ हजार, ९३८ स्वस्त धान्य दुकाने चालविले जात आहेत. या शासन मान्य रास्त भाव दुकाने तपासणीचे काम कोरोना संसर्गामुळे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. त्यामुळे गत दोन महिन्यातील रास्तभाव दुकानांच्या तपासणीचे तालुकानिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा: एमआयडीसीतील जागेसह ‘ऑक्सिजन’साठी ८० लाख

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी तालुका स्तरावर स्वस्त धान्य दुकान रेकाॅर्ड तपासणी दरमहा नियमित वेळी करण्यात येते. परंतु विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रास्तभाव दुकानांची तपासणी करण्याचे प्रमाण काही अंशी प्रभावीत झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातील रास्तभाव दुकानांच्या तपासणीचे तालुकानिहाय अहवाल काही ठिकाणी प्रलंबित आहेत.

सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

संपादन- भूषण श्रीखंडे