esakal | जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कायम

बोलून बातमी शोधा

corona

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग कायम आहे. जळगाव शहरात आठवडाभरापासून संसर्ग कमी झाला असली तरी जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर तालुका नवे हॉटस्पॉट ठरत आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती, तर २१ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये

जळगाव जिल्ह्यात सुरवातील मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे व बरे होणारे वाढत आहेत. मात्र, जामनेर, पाचोरा व मुक्ताईनगरसारखे तालुके संसर्गाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. ग्रामीण भागातून आता नवे रुग्ण सातत्याने समोर येत आहेत.

शुक्रवारी ८ हजार ७६९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १००७ नवे रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १लाख २२ हजारांवर पोचली. तर गेल्या २४ तासांत १ हजार ३० रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ९ हजार १५९ झाला आहे. दिवसभरात ५० वर्षांखालील पाच जणांच्या मृत्यूसह २१ जणांचा बळी गेला. तर सारी, कोविड संशयित, नॉन कोविड व अन्य आजारांनी १६ जण दगावले.

हेही वाचा: आधी लढाई कोरोनाशी..मग गाठ विवाह बंधनाची, नियोजित वराची अनोखी शपथ !

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १४१, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १०१, अमळनेर ४७, चोपडा ३२, पाचोरा १४८, भडगाव ८, धरणगाव १२, यावल ३१, एरंडोल ५८, जामनेर ११२, रावेर ४६, पारोळा १७, चाळीसगाव ५८, मुक्ताईनगर १११, बोदवड ६१.

हेही वाचा: रोगापेक्षा इलाज भंयकर..लसीकरण केंद्रावर धुमाकूळ !

लसीकरण सुरु

शुक्रवारी लशींचा साठा प्राप्त झाल्यानंतर आज विविध केंद्रांवर लसीकरण सुरु झाले. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आज दिवसभरात विविध केंद्रांवर ६ हजार ९३६ जणांनी लशीचा पहिला डोस घेतला तर ५ हजार ५७९ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

संपादन- भूषण श्रीखंडे