दिलासादायक : सलग सातव्या दिवशी बरे होणारे अधिक 

सचिन जोशी
Thursday, 24 September 2020

जिल्ह्यातील प्रमाण ७८.३९ टक्के झाले आहे. नवीन ४४३ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४५ हजार ८७२ वर पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सध्या ॲक्टिव्ह रुग्ण केवळ आठ हजार ७७४ राहिले आहेत. 

जळगाव  : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात ७८३ रुग्ण बरे झाले, तर ४४३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत आठ रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण बळींची संख्या ११३७ वर पोहोचली आहे. 

संबधित बातमी ःजळगावकरांसाठी दिलासादायक; कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्णाची होतेय घट

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळणारे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक, असे चित्र दिसत आहे. आज सलग सातव्या दिवशी बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. दिवसभरात ७८३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांचा आकडा ३५ हजार ९६१ वर पोहोचला असून, बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ७८.३९ टक्के झाले आहे. नवीन ४४३ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४५ हजार ८७२ वर पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सध्या ॲक्टिव्ह रुग्ण केवळ आठ हजार ७७४ राहिले आहेत. 

जळगाव शहरालाही दिलासा 
जळगाव शहरातही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी एकही मृत्यू नव्हता, तर गुरुवारी केवळ एका मृत्यूची नोंद जळगावात करण्यात आली. नव्याने ११४ रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ३९८ रुग्ण बरे झाले. 

वाचा ः जळगावच्या नागरिकांना सुसज्ज नवे नाना-नानी पार्क मिळणार    

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- १३४, जळगाव ग्रामीण- ६, भुसावळ- ५३, अमळनेर- ४१, चोपडा- ४३, पाचोरा- १४, भडगाव- १०, धरणगाव- ७, यावल- २५, एरंडोल- १२, जामनेर- १९, रावेर- ३३, पारोळा- ११, चाळीसगाव- ३८, मुक्ताईनगर- ४, बोदवड- १२. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patien has a higher recovery rate