esakal | जळगाव जिल्ह्यात ९ लाख संशयितांची झाली कोरोना चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

जळगाव जिल्ह्यात ९ लाख संशयितांची झाली कोरोना चाचणी

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या ८ लाख ९२ हजार ८० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पैकी आतापर्यंत (२६ एप्रिल) १ लाख १७ हजार ९१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा १३ टक्क्यांपर्यत खाली आला आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

हेही वाचा: अरे बापरे..सिव्हिलमध्ये आग ! नंतर सर्वांचा सुटकेचा निःश्‍वास

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटूंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेही स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.

हेही वाचा: अक्कलपाडा धरणांतून "पांझरा"त आवर्तन सोडा !

दैनंदिन ५ ते १० हजार चाचण्या :

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन ५ ते १० हजार कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या ८ लाख ९२ हजार ८० व्यक्तींच्या कोरोना तपासणीपैकी ६ लाख २१ हजार ७५० व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी ६७ हजार ४६१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर २ लाख ७० हजार ३३० व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पैकी ५० हजार ४५५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. १ हजार ६८९ इतर अहवाल आढळले असून सध्या अवघे ९८९ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोविडचे नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image