स्‍मार्ट हेल्‍मेटद्वारे कोरोना चाचणी; एका मिनिटात दोनशे जणांची तपासणी

smart helmet
smart helmet

जळगाव : जी.एम. फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे शहरात ‘कोरोना स्मार्ट हेल्मेट’द्वारे नागरिकांचे पूर्ण शरीर ‘थर्मल स्कॅन’ करण्यात येत आहे. या हेल्मेटद्वारे एका मिनिटात दोनशे जणांची तपासणी होऊ शकते. 
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत ही मोहीम राबविणायत येत आहे. हे हेल्मेट भारतीय जैन संघटना पुणेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या तपासणीची सुरवात पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, विराज कावडीया, अमित जगताप, अरविंद देशमुख, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शहर संघटक दिनेश जगताप, माजी महापौर विष्णू भंगाळे, रामेश्वर नाईक, जितेंद्र छाजेड, पितांबर भावसार, इत्यादी उपस्थित होते. 


पंधरा लाखाचे हेल्‍मेट
हेल्मेटची किंमत सुमारे १५ लाख रुपये असून पुढील दोन आठवडे मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. हेल्मेट हाताळण्यासाठी भारतीय जैन संघटना पुण्याचे चार स्वयंसेवक जळगावात आले आहेत. भारतात असे फक्त चार हेल्मेट उपलब्ध आहेत. एका मिनिटात सुमारे २०० लोकांची तपासणी या हेल्मेटद्वारे होऊ शकते. 

दोन दिवसात बारा हजार जणांची तपासणी
शनिवार व रविवारी तुकारामवाडी, गणेशवाडी, रणछोडनगर, जानकी नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर या भागात दोन दिवसात १२हजार ३१२ जनाची स्कॅनिंग करण्यात आली आहे. यापैकी ४८ जण संशयित आढळून आले. त्यांना पुढील चाचणी साठी पाठविण्यात आले आहे. पुढील चाचणी मनपाचे डॉक्टर संजय पाटील बघत आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पुढील दिवसांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com