कोरोनाचा कहर सुरूच : दिवसभरात 169 नवे रूग्ण   

corona
corona

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज दिवसभरात 169 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात सर्वाधिक रूग्ण जळगाव शहरात 73 आढळून आले आहेत. आजच्या पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 5 हजार 471 वर पोहचला आहे. 


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेर पालिका परिसरात चार दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनचे परिणाम पुढील आठवड्यात दिसून येणार असले तरी लॉकडाउन होणार या बातमीनंतर मार्केटमध्ये झालेल्या गर्दीने गेल्या दोन दिवसात कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कालच्या तुलनेत आजच्या बाधितांचा आकडा कमी आला असला तरी देखील 169 नवीन रूग्णांमुळे एकूण कोरोना बाधीतांची संख्या 5 हजार 471 पोहचली आहे. 

सहा जणांचा मृत्यू 
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील रोजचा वाढत आहे. बऱ्या होणाऱ्या रूग्णांच्या तुलनेत हा आकडा कमी वाटत असला तरी देखील जिल्ह्यात कोरोनामुळे रोज मृत्यू होत आहेत. आज दिवसभरात सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 315 वर पोहचली आहे. 

जिल्ह्यात असे आढळले रूग्ण 
जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 73, जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 13, अमळनेर 9, चोपडा 13, पाचोरा 4, भडगाव 4, धरणगाव 6, यावल 7, एरंडोल 1, जामनेर 10, रावेर 8, चाळीसगाव 4, बोदवड 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com