लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !

गेल्या पाच दिवसांत लशींचा साठा नसल्याने हे लसीकरण प्रत्यक्ष सुरू होऊ शकले नाही
लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !




जळगाव :
लसीकरणासाठी (Corona vaccination) ॲपवर नोंदणीपासून केंद्रावर (Center) (Registration) लशीचा डोस मिळेपर्यंत होणाऱ्या प्रक्रियेत आज कमालीचा गोंधळ उडाला. एकतर नोंदणी होत नाही, ती झाली तर वेळ व दिवसाचा स्लॉट मिळत नाही. स्लॉट मिळाला तरी डोस मिळण्यात अडचणी... अशा एक ना अनेक तक्रारी आज समोर आल्यात. त्यामुळे तासन्‌तास लाभार्थी ताटकळले आणि त्यातून संतप्त भावना व्यक्त झाल्या.

(corona vaccination planning fails citizens crowds center)

लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !
ऑक्‍सिजन, बेडनंतर कोरोनाबाधितांसमोर गोळ्यांची समस्‍या; रुग्णांची प्रकृती खालावतेय

सरकारने (Government) ( जाहीर केल्याप्रमाणे १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. त्यासाठी कोविन ॲपवर (Covin App)) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत लशींचा साठा नसल्याने हे लसीकरण प्रत्यक्ष सुरू होऊ शकले नाही. शिवाय ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीचे लसीकरणही लशींच्या साठ्याअभावी थंड बस्त्यात होते.


केंद्रांवर उडाली गर्दी
दुसरीकडे कालच जिल्ह्यात सुमारे ७० हजार लशींचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे गुरुवार(ता. ६)पासून लसीकरण सुरू होणार म्हटल्यावर विविध केंद्रांवर एकच गर्दी उडाली. १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील अशा लाभार्थींसाठी स्वतंत्र वर्गीकरण, स्वतंत्र केंद्र अथवा रांगा अशी व्यवस्था नसल्याने केंद्रांवर चांगलीच धांदल उडाली.


नोंदणीनंतरही लस नाही
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. महत्प्रयासाने ज्यांनी नोंदणी केली व दिवस, वेळेचा स्लॉट घेतला त्यापैकी अनेकांना आज लशीचा डोस घेतल्याविना परतावे लागले. एकच गर्दी उडाल्याने हा गोंधळ झाला.


लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !
लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

सर्वर डाउनमुळे गोंधळ
शिवाय, प्रत्यक्ष लस देतानाही ऑनलाइन प्रक्रिया करावी लागत असल्याने सर्वरच डाउन असल्यामुळेही हा गोंधळ उडाल्याचे स्पष्टीकरण आरोग्य यंत्रणेने दिले आहे. रोटरी हॉल, रेडक्रॉस, शिवाजीनगर मनपा रुग्णालय, शाहू महाराज, चेतनदास मेहता, नानीबाई रुग्णालय अशा सर्वच केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात गोंधळ उडाला.


पहाटे तीनपासून रांगा
लशींचा साठा प्राप्त झाल्यानंतर गुरुवार (ता. ६) पासून लसीकरण सुरू होणार होते. त्यासाठी आज पहाटे तीन-चारपासूनच केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. १८ ते ४४ वयोगटांसह ४५वरील व्यक्तींनीही गर्दी केली होती. वर्गीकरण नसल्याने व अनेक केंद्रांवर स्वतंत्र व्यवस्था नसल्याने वादही झाले.


कोव्हिशील्ड हवी, कोवॅक्सिन आली
रोटरी क्लब, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यातर्फे रोटरी क्लब, मायादेवीनगर हॉल येथे लसीकरण सुरू आहे. या ठिकाणच्या केंद्रासाठी कोव्हिशील्डसाठी नोंदणी केली होती. परंतु, कोवॅक्सिन लस आली. नंतर ती परत करून कोव्हिशील्डचा साठा मागविण्यात आला. त्यामुळे खूप गोंधळ उडाला.


पोलिस बंदोबस्त
लशींचा साठा प्राप्त झाल्याचे कळल्यानंतर या केंद्रावर बराच गोंधळ उडाला. गर्दी होणार होती म्हणून रोटरी क्लबने पोलिस बंदोबस्त मागविला होता.

...अशा आहेत अडचणी

१८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींना लसीकरणासाठी आरोग्यसेतू अथवा कोविन ॲपवर नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, बऱ्याचदा नोंदणी करताना नावे अपलोड केल्यानंतर जेव्हा केंद्र निवड व वेळेचा स्लॉट निवडायची वेळ येते तेव्हा केंद्राचे नाव दिसते. मात्र लशीची उपलब्धता शून्य दाखवली जाते. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !
रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक

आता स्वतंत्र केंद्र असतील
काही दिवसांपासून लशींचा साठा नव्हता. आता साठा आल्यामुळे नागरिकांनी केंद्रांवर गर्दी केली. नोंदणी नसलेलेही लोक केंद्रांवर दाखल झाले. त्यामुळे गोंधळ उडणे स्वाभाविक होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात रात्री बैठक घेतली. त्यात पुढचे नियोजन करण्यात आले. आता १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील अशा दोन्ही गटांसाठी लसीकरणाची स्वतंत्र केंद्र असतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

(corona vaccination planning fails citizens crowds center)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com