
जळगाव : गेल्या दोन-तीन दिवसांपासून अडीच- तीनशे नव्या बाधितांचा टप्पा गाठणाऱ्या जळगाव जिल्ह्याला आज थोडा दिलासा मिळाला. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा (२०५) बरे झालेल्या रुग्णांची संख्या (२२५) अधिक आहे. जळगाव शहरात आज पुन्हा ६८ रुग्ण आढळून आले असले तरी बरे झालेल्यांची शहरातील संख्या ८८ आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा वाढतोय. गेले दोन दिवस हा आकडा तीनशेच्या वर होता. आज त्यात काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात प्राप्त अहवालात २०८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
आवर्जुन वाचा : पित्याला अग्निडाग...दुःख बाजूला सारत इंजेक्शन केले सुपूर्द अन् दोन्ही भावांचे वाचला कोरोनातून जीव
बरे होणारे ६२ टक्के
रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढत आहे, ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. आजही दिवसभरात २२५ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही ५ हजार ५१ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक अर्थातच, जळगाव शहरातील असून ती संख्या १२०९ आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६२ टक्के आहे.
नऊ जणांच्या मृत्यूने चारशेचा टप्पा
एकीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी दररोजची मृत्यूसंख्या आठ-दहाच्या घरात आहे. सोमवारीही त्यात ९ जणांची भर पडल्याने एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ४०० झाली आहे. आजच्या मृत्यूत तीन जण पन्नाशीच्या आतले आहेत.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ६८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ १०, अमळनेर ३४, पाचोरा ८, भडगाव ६, धरणगाव ३, यावल ३, एरंडोल ८, जामनेर २३, रावेर १, पारोळा २८, चाळीसगाव ११, मुक्ताईनग १.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.