esakal | दुसऱ्या लाटेची शक्‍यता..मनपा रुग्णालयात सातशे खाटांची तयारी 
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corporation hospital

दिवाळीपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, दिवाळीनंतर आता रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातही दोन दिवसांत ही संख्या वाढल्याचे दिसते. जळगाव शहरात शुक्रवारी (ता.२०) रुग्णसंख्या वाढली.

दुसऱ्या लाटेची शक्‍यता..मनपा रुग्णालयात सातशे खाटांची तयारी 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : दिवाळीनंतर कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेनेही त्याचा मुकाबला करण्याची तयारी ठेवली आहे. त्यासाठी रुग्णालयात सहाशे ते सातशे खाटा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. शनिवारी (ता. २१) त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. 
दिवाळीपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, दिवाळीनंतर आता रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातही दोन दिवसांत ही संख्या वाढल्याचे दिसते. जळगाव शहरात शुक्रवारी (ता.२०) रुग्णसंख्या वाढली. जळगाव येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात तब्बल सहाशे ते सातशे खाटा तयार आहेत. या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध आहे. गंभीर रुग्णांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिकाही तयार आहे. 

महापौरांची पाहणी 
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सज्जता असण्याची गरज असल्याने, महापौर भारती सोनवणे यांनी शनिवारी शासकीय पॉलिटेक्निकमध्ये जाऊन कोविड सेंटरची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी याच्यांशी चर्चा करून सुविधांची माहिती घेतली. नगरसेवक कैलास सोनवणे त्यांच्यासमवेत होते. 

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी जळगावकरांनी सावधानता बाळगली पाहिजे, सर्वांनी तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडले पाहिजे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेने संपूर्ण तयारी ठेवली आहे. जनतेने घाबरू नये. 
भारती सोनवणे, महापौर, जळगाव 

महापालिकेतर्फे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात सहाशे ते सातशे खाटांची सुविधा करण्यात आली आहे. आवश्‍यक असल्यास तातडीची ऑक्सिजन व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर, परिचारिका तसेच इतर स्टाफही सज्ज आहे. 
डॉ. राम रावलाणी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका वैद्यकीय विभाग 

संपादन ः राजेश सोनवणे