जळगावः कापसाचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ

कपाशीची जास्त लागवड तालुक्यातील पाचही मंडळात केली गेली होती. मात्र अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Cotton
Cotton


पारोळा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (corona) परिस्थिती हालाकीची होऊन यंदा खरीप हंगाम चांगला जाईल, या आशेने शेतकऱ्यांनी (Farmer) जमिनीत पैसा ओतला. मात्र, अतिवृष्टी, वादळ व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. हाती येणारे उत्पन्न पाण्याखाली गेले. शेतकऱ्यांचे नगदी व पांढरे सोने (Cotton) पावसाअभावी काळे पडले आहे. त्यात शेतकऱ्यांनी समाधान मानून पुन्हा लढ म्हणत शेतात राबून पीक (crop) वाचविण्याचा प्रयत्न केला.

Cotton
पाडळसरे धरणासाठी खासदार मंत्रालयासमोर आंदोलन करणार


मागील वर्षीपेक्षा यंदा कापसाने आठ ते साडेआठ हजाराचा प्रतिक्विंटलचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक बळ मिळाले आहे. शेतात लागलेला पैसा व मजुरी याचे समीकरण शेतकऱ्यांचे कापसाच्या भावामुळे बसत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. खोपडी एकादशीनंतर कापूस प्रतिक्विंटल दहा हजारांचा पल्ला गाठेल,असे जाणकारांचे म्हणणे आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत कपाशीची जास्त लागवड तालुक्यातील पाचही मंडळात केली गेली होती. मात्र अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कापसाची आवक घटली आहे. विशेष म्हणजे खासगी व्यापारी कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांना आठ ते साडेआठ हजार रुपये भाव देत असल्याने वाढलेल्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Cotton
१८ महिन्यांचा महागाई भत्ता गोठविल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट


कपाशी वेचणीतून मजुरांची दिवाळी गोड

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नव्हते. या वेळी शेतकऱ्यांनी वेचणीचा जास्तीचा दर देऊन वाया जाणारा कापूस कसा सुरक्षित येईल, या भावनेने मजुरांची मनधरणी करत कुटुंबासोबत कापूस घरापर्यंत आणला. मजुरांना २०० ते ३०० रुपये रोजंदारी मिळाल्याने मजूर वर्गाने यंदाची दिवाळी गोड केल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com