esakal | जळगाव जिल्ह्यात चोविस तासांत दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू !
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात चोविस तासांत दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू !

जळगाव शहरातील नविन रुग्णांची संख्येत घट होत संख्या दिडशेच्या आत होती. शहरात शुक्रवारी ९२ नवे रुग्ण आढळून आले होते. परंतू आज पून्हा नव्याने बाधित रुग्णांची संख्या वाढली.

जळगाव जिल्ह्यात चोविस तासांत दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : गेल्या दहा दिवसापासून नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार ७७१ रुग्ण दिवसभरात बरे झाले; तर नव्या बाधितांचा आकडा पाचशेच्या आत म्हणजे ४६७ एवढा नोंदवला गेला. असे असले, तरी मृत्यूचे सत्र थांबायला तयार नसून, गेल्या २४ तासांत आणखी १० रुग्णांचा मृत्यू झाला. 

आवश्य वाचा- ‘रास्ता रोको’ करतांना  ४४ जणांनी मास्क लावले नाही; पोलिसांनी दाखल केला गुन्हा 
 

कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून बाधित रुग्ण व बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनात्मक आकड्यांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग महिनाभरापासून सहा-सातशे, आठशे ते अगदी हजाराच्या वर गेलेला रुग्णांचा आकडा दहा दिवपासून पाचशेच्या आत राहिला. आज नव्याने ४६७ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ७४२ वर पोचली, तर दिवसभरात ७७१ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांचा आकडा ३७ हजार ५५२ झाला, तर रिकव्हरी रेट ८०.३४ टक्के झाले आहे. 

जळगावात पून्हा संख्या वाढली  
गेल्या तिन ते चार दिवसापासून जळगाव शहरातील नविन रुग्णांची संख्येत घट होत संख्या दिडशेच्या आत होती. शहरात शुक्रवारी ९२ नवे रुग्ण आढळून आले होते. परंतू आज पून्हा नव्याने बाधित रुग्णांची संख्या वाढली असून १८४ नवे बाधित आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासनासाठी डोकेदुखी वाढणार आहे. तर कोरोना बाधित १० जणांच्या मृत्यूच्या संख्येत जळगाव शहरातील तीन जणांचा समावेश आहे. तर आज मृत्यू झालेल्या दहा रुग्णांमध्ये एक ४२ वर्षीय व्यक्ती सोडून सर्व पन्नासी वरील व्यक्तिंचा समावेश आहे. 
 
वाचा- अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू;संतप्त शेतकऱयांनी दिला इशारा !


असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १८४, जळगाव ग्रामीण १८, भुसावळ ३०, अमळनेर ३९, चोपडा १८, पाचोरा १७, भडगाव २७, धरणगाव ५, यावल ७, एरंडोल ५, जामनेर ३२, रावेर ३०, पारोळा २५, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर १०, बोदवड १०, अन्य जिल्ह्यातील २.
 

loading image
go to top