esakal | दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणारे रुग्ण अधिक

बोलून बातमी शोधा

covid
दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणारे रुग्ण अधिक
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख गेल्या काही दिवसांपासून स्थिर येत आहे. गुरूवारी देखील नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा ४० ने अधिक होता. दिवसभरात एक हजार ६३ रुग्ण आढळले तर एक हजार १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत २१ जणांचा बळी गेला.

हेही वाचा: लग्नाच्या अक्षदा पडणार..तोच हातात पडली दंडाची पावती !

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र तीन आठवड्यांपासून काहीअंशी कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतांना दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. गुरूवारी आज तब्बल अकरा हजार ४२३ चाचन्याचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक हजार ६३ नवे बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख २० हजार ९९७ वर पोचली, तर एक हजार १०३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख आठ हजार १२९ झाला आहे. तर २१ जणांच्या मृत्यूने बळींची संख्या दोन हजार १६३ वर पोचली आहे. अद्यापही मृत्युदर १.७९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सारी, नॉन कोविड, कोविडनंतरची व्याधी आदींनी १८ जणांचा गुरुवारी बळी गेला.

हेही वाचा: हे आहेत भारतातील 10 सर्वोत्तम विवाहासाठी स्थाने

अमळनेर, जामनेर ठरतेय हॉटस्पॉट

जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर, भुसावळ, चोपडा नंतर आता अमळनेर, जामनेर हे हॉटस्पॉट ठरत आहे. हे गेल्या काही दिवसापासूंना येथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज अमळनेर २०५ तर जामनेर १२६ रुग्ण आढळून आले आहे.

हेही वाचा: गाव वीस..आणि आरोग्याचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर !

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात दिवसभरात १६७ नवे बाधित आढळून आले, तर २३० रुग्ण बरे झाले. जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९३, अमळनेर २०५, चोपडा ९०, भडगाव ९, पाचोरा ४७, धरणगाव २६, यावल २८, एरंडोल ८६, जामनेर १२६, रावेर ४६, पारोळा १९, चाळीसगाव ७४, मुक्ताईनगर २, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ७.