जळगाव जिल्ह्यातील १३ कोविड सेंटरवर ऑडीटरची नेमणूक

देविदास वाणी
Wednesday, 7 October 2020

हॉस्पिटलकडे असलेल्या एकूण बेड पैकी ८० टक्के बेडस कोविड बाधीतांसाठी आहे. असे घोषीत करावे, तसा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सकांना सादर करावा.

जळगाव ः जिल्ह्यात नव्याने १३ कोविड सेंटरसाठी परवानगी दिलेल्या रुग्णालयातील बिलांच्या लेखा परीक्षणासाठी १५ ऑडीटरची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत रुग्णालयाने नियमानुसार बिल घेतले आहे किंवा नाही, त्याबाबतचा अहवाल सोबत नियम,अटींचे पालन केले आहे किंवा नाही याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. 

आवर्जून वाचा- विद्यार्थ्याने लढवली अजब शक्कल, आणि दाखविले अकल के साथ भैस भी बडी !
 

लेखा परिक्षकांनी संबंधित हॉस्पिटलकडे असलेल्या एकूण बेड पैकी ८० टक्के बेडस कोविड बाधीतांसाठी आहे. असे घोषीत करावे, तसा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सकांना सादर करावा. बिलाबाबत येणाऱ्या बिलांचे लेखा परिक्षण करावे, प्रशासकीय, तांत्रीक समस्या असल्यास तातडीने संपर्क करावा. 
 

वाचा-‘ओला दुष्काळ’च्या आशेवर पाणी; आणेवारी ७० पैसे जाहीर 
 

नेमलेले लेखा परीक्षक असे ः कोविड सेंटर कंसात लेखा परिक्षकांची नावे याप्रमाणे ः पाचोरा येथील नवजीवन कोविड सेंटर (अप्पर लेखापरिक्षक एम.डी.नेहते, सहाय्यक सोनिया भुसारी), पाचोरा येथील साई कोविड हॉस्पिटल (तापी खोरे विकास महामंडळ, जळगाव), पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पीटल (सहाय्यक लेखाधिकारी कैलास बडगूजर), पाचोरा येथील व्यंकट गोपाळ कोविड हॉस्पीटल (कनिष्ठ लेखाधिकारी किरण खैरे, पाचोरा), पाचोरा येथील श्रीकृष्ण हॉस्पीटल (लेखाधिकारी शामकांत न्याहाळदे), जळगाव येथील अंजली हॉस्पीटल (सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, जळगाव), जळगाव येथील गुलाबराव देवकर हॉस्पीटल (लेखाधिकारी आर.एम.तडवी, सहायक मिलींद चौधरी), भडगाव येथील लाइफ लाईन कोविड केअर सेंटर (सहाय्यक लेखाधिकारी आर.एन.बावीस्कर, लेखा परिक्षक एम.ए.वळवी), जामनेर येथील दर्पण बहूउद्देशीय प्रतिष्ठान (उपकोषागार अधिकारी गिरीष बावीस्कर), शेंदूर्णी येथील ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल (उपलेखा परिक्षक बी.डी.शिंदे), चोपडा येथील नृसिंह हॉस्पीटल (उपकोषागार अधिकारी के.आर.सपकाळे), चोपडा येथील पाटील हॉस्पीटल (सहाय्यक लेखापाल संतोष पुनेकर). 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district collector appoints officers for audit of bills at thirteen Kovid Centers in the district